Advertisement

प्रकल्पबाधितांच्या घरे वाटपात बायोमेट्रीकचा आधार


प्रकल्पबाधितांच्या घरे वाटपात बायोमेट्रीकचा आधार
SHARES

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या विविध विकासकामांच्या प्रकल्पामध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्ये केले जाते. परंतु प्रकल्पबाधितांना दिलेल्या घरांमध्ये इतर घुसखोरच राहत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे यासाठी आता महापालिकेने यापुढे प्रकल्पबाधितांना बायोमेट्रीक पद्धतीने तसेच आधार कार्डला लिंक करूनच घरांचे वाटप करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.


घुसखोरांचे वास्तव्य

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच सर्व विभागांच्या खातेप्रमुखांची आढावा बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी  या सूचना दिल्या आहेत. प्रकल्पबाधितांना सध्या नियमानुसार महापालिकेच्यावतीने घरे देण्यात येत असली तरी प्रत्यक्षात या घरांमध्ये अधिक प्रमाणात घुसखोर राहत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रकल्पबाधित कुटुंबाला सदनिकेचे वाटप करताना त्याची बायोमेट्रीक माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहे.


‘आधार’ची मदत

प्रकल्पबाधितांव्यतिरिक्त कोणी राहत असेल तर आधार कार्ड अंतर्गत उपलब्ध असलेल्या माहितीचा वापर करण्याच्याही सूचना करण्यता आल्या आहेत. प्रकल्पबाधितांसाठी असलेल्या प्रकल्प बाधितांसाठी असलेल्या घरांमध्ये संबंधित व्यक्तीच वास्तव्यास असल्याची शहानिशा नियमितपणे करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. तसेच वेळोवेळी अचानक तपासणी (Surprise Verification) करण्याचेही आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत.


माहुलमध्येच सर्वाधिक घुसखोर

मुंबईतील सर्व विकासकामांमधील बाधित कुटुंबांचे पुनर्वसन माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीत केले जात आहे. परंतु येथील आतापर्यंत सुमारे पाच हजारांहून अधिक कुटुंबांचे पुनर्वसन करण्यता आले असून महापालिकेच्या ताब्यात नसलेल्या इमारतींमध्येही कुटुंबे राहत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरच राहत असल्याचा आरोप होत आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा