Advertisement

मुंबईत ६१९ धोकादायक इमारती

महापालिकेनं ६१९ धोकादायक इमारतीत अापला जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या ७५०० पेक्षा जास्त नागरिकांना बिल्डिंग खाली करण्याची विनंती केली अाहे. गेल्या वर्षी बीएमसीनं ७९१ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. त्यापैकी ६१९ इमारतींना सी-१ गटात म्हणजेच अतिधोकादायक गटात टाकलं अाहे.

मुंबईत ६१९ धोकादायक इमारती
SHARES

गेल्या वर्षी मुंबईची तुंबई झाल्यानंतर अाता मुंबई महापालिकेनं पावसाळ्याची जय्यत तयारी सुरू केली अाहे. त्यासाठी महापालिकेनं ६१९ धोकादायक इमारतीत अापला जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या ७५०० पेक्षा जास्त नागरिकांना बिल्डिंग खाली करण्याची विनंती केली अाहे. गेल्या वर्षी बीएमसीनं ७९१ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती. त्यापैकी ६१९ इमारतींना सी-१ गटात म्हणजेच अतिधोकादायक गटात टाकलं अाहे. या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना पालिकेनं नोटिस पाठवून इमारत खाली करण्याचे अादेश दिले अाहेत.


फक्त ७२ इमारती रिकाम्या

या ६१९ इमारतींपैकी फक्त ७२ इमारती रिकाम्या करण्यात अाल्या असून त्या लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार अाहेत. त्याचबरोबर अाणखी ४१ इमारतींची तांत्रिक सल्लागार समितीनं शिफारस केली अाहे. सी-१ (धोकादायक), सी-२ (महत्त्वाचं नुतनीकरण अावश्यक) अाणि सी-३ (किरकोळ सुधारणा अावश्यक) यापैकी कोणत्या गटात इमारतींची नोंदणी करायचा, याचा सर्वस्वी अधिकार ही समिती घेत असते.


कोणत्या भागात धोकादायक इमारती?

या वर्षी धोकादायक इमारतींच्या यादीतील सर्वाधिक इमारती या एल वाॅर्ड म्हणजेच कुर्ला अाणि साकीनाका येथील अाहेत. या ठिकाणी तब्बल १०६ धोकादायक इमारतींची नोंद करण्यात अाली अाहे. घाटकोपर इथं ५१ इमारती धोकादायक यादीत अाहेत.


जवळपास १२० इमारतींचं वीज अाणि पाण्याचं कनेक्शन कापण्यात अालं अाहे. या इमारती कोणत्याही परिस्थितीत खाली करण्यात याव्यात, यासाठी पोलिसांनाही कळवण्यात अालं अाहे.
- निधी चौधरी, पालिकेच्या उपायुक्त


हेही वाचा -

का झाले भेंडीबाजारातील रहिवासी जीवावर उदार?

मुंबईतील त्या १०४ इमारतींवर मेपूर्वी होणार कारवाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा