Advertisement

'मधमाशींवरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा' पालिकेची मागणी

साप चावणं, मधमाशी चावणं हे सर्व प्रकार गावाकडे व्हायचे. परंतु, आता असे प्रकार मुंबईतही घडत असून बोरीवलीमधील वीर सावकर उद्यानात मधमाशी चावल्यामुळे पंकज शाह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले. त्यामुळे अशाप्रकारे मधमाशांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे काय यंत्रणा आहे, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केला.

'मधमाशींवरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा राबवा' पालिकेची मागणी
SHARES

बोरीवली येथील वीर सावरकर उद्यानात विषारी मधमाशी चावल्यामुळे एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याने याचे तीव्र पडसाद महापालिका सभागृहात उमटले. मात्र, अडकलेल्या पक्षी आणि जीवांना तसंच आगीच्या दुघर्टनांमध्ये सापडलेल्यांना वाचवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल असलं तरी त्यांना मधमाशींचं पोळ काढण्याचं प्रशिक्षण नाही. त्यामुळे मुंबईतील अनेक भागामध्ये आणि झाडांवर अशाप्रकारची मधमाशांची पोळी असून ती काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याची मागणी महापालिका सभागृहात सदस्यांनी केली आहे.

महापालिकेकडे यंत्रणा आहे का?

साप चावणं, मधमाशी चावणं हे सर्व प्रकार गावाकडे व्हायचे. परंतु, आता असे प्रकार मुंबईतही घडत असून बोरीवलीमधील वीर सावकर उद्यानात मधमाशी चावल्यामुळे पंकज शाह नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी झाले. त्यामुळे अशाप्रकारे मधमाशांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेकडे काय यंत्रणा आहे, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका शितल म्हात्रे यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे केला.

'जबाबदार संस्थेवर कारवाई करा'

सावरकर उद्यान दत्तक तत्वावार चालवण्यास दिलं आहे. त्यामुळे या भागात मधमाशी असल्यास ते काढण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची होती. त्यामुळे संबंधित जबाबदार संस्थेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसंच याबाबत लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्यामुळे प्रशासनाने निवेदन करण्याची मागणीही त्यांनी केली.

'ती' यंत्रणा निर्माण करा

भाजपाचे गणेश खणकर यांनी याठिकाणी यापूर्वीही मधमाशांना हाकलण्याचा प्रयत्न झाला होता. तरीही त्याठिकाणी पुन्हा मधमाशा आल्या होत्या. परंतु, या मधमाशांचे पोळ काढून त्यांना हाकलून लावण्यासाठी कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी या हरकतीच्या मुदद्याला पाठिंबा देत, जर अशाप्रकारची यंत्रणा महापालिकेकडे नसल्यास ती यंत्रणा निर्माण केली गेली पाहिजे असं सांगितलं.

मग उपाययोजना कधी?

आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेकडे आपत्कालिन व्यवस्थापन सज्ज आहे. परंतु, अशाप्रकारे मधमाशांचे प्रकार वाढल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी काही उपाययोजना आहे काय? असा सवाल करत यासाठी आपली स्वत:ची यंत्रणा तयारी केली जावी. कारण या हा प्रकार उद्यानात झाला असला तरी महापालिकेच्या ताब्यातही अनेक उद्याने, रस्त्यालगत झाडं आहेत. त्यामुळे असे प्रकार उद्भवू शकतात, असं सांगितलं. त्यावर महापौरांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

हेही वाचा -

बोरीवलीत मधमाशांनी घेतला एकाचा जीव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा