Advertisement

मारुती मंदिर हटवलं, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यांवरील वाहतूककोंडी फुटणार


मारुती मंदिर हटवलं, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यांवरील वाहतूककोंडी फुटणार
SHARES

आयआयटी पवई येथे जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून अडसर ठरणारं मारुती मंदिर हटवण्यात महापालिकेला यश आलं आहे. हे मंदिर हटवल्यानंतर येथील मारुतीची मूर्ती इमारत परिसरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

बुधवारी रात्रीपर्यंत या मंदिरात दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या स्थानिकांना गुरुवारी मोठा धक्का बसला. येथील मंदिरच गायब होऊन तिथं डांबराचा नवा कोरा रस्ता बांधण्यात आला होता. मंदिर हटवल्यामुळे नागरिक नाराज झाले होते, परंतु रुंद झालेल्या रस्त्यांवरील डांबरीकरण पाहून त्यांना एकप्रकारे सुखद धक्काही बसला.


प्रचंड वाहतूककोंडी

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर आयआयटी पवई परिसरात हे जुनं मारुती मंदिर आहे. या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होत असे. त्यामुळे हे मंदिर हटवण्यासाठी महापालिकेने यापूर्वी नोटीसही दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या ‘एस’ विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे ४ वाजता या मंदिरावर कारवाई करून हे मंदिर हटवलं आणि हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.



मंदिर नवं, पण मूर्ती जुनी

महापालिकेच्या ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. इथे मारुती दर्शन नावाने नवीन इमारत बांधून तयार झाली, तरी जुनं मंदिर आपल्या जागेवरच होतं. नवीन मंदिर उभारून त्यात जुन्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे गुरुवारी पहाटे ४ वाजता महापालिकेच्या पथकाने ही कारवाई करत मारुती दर्शन इमारतीतील मारुती मंदिरात जुन्या मंदिरातील मूर्ती ठेवली.


वाहतुकीला दिलासा

महापालिकेने मारुतीची मूर्ती सुरक्षितपणे ठेवल्यानंतर मंदिरावर कारवाई करून सर्व अतिक्रमण हटवले आणि त्यानंतर सर्व डेब्रिजसह सामान हटवून येथील रस्ता डांबराने चकाचक करण्यात आला. परिणामी जोडरस्त्यावर होणारी वाहतूककोडींची समस्या आता बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असा विश्वास संतोषकुमार धोंडे यांनी व्यक्त केला.



विक्रोळीत कारवाई

विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत महापालिकेच्या 'एस' विभागाने कारवाई केली. या स्टाॅलचं प्रकरण न्यायालयात सुरू होतं. येथील तब्बल २० स्टॉल्स तोडण्यात आल्याची माहिती ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी दिली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा