11 मजली अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा

मस्जिद बंदर - केशवजी नाईक रोडवरील अनधिकृत इमारत तोडण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. दोन दिवसांत या इमारतीचे तोडकाम पूर्ण होईल. या इमारतीला 4 माळ्यांची परवानगी देण्यात आली होती. पण चक्क नियम धाब्यावर बसवून 11 माळ्यांची इमारत बांधण्यात आली. या इमारतीच्या मागे रेल्वेचा पूल आहे. पण त्या पुलाला धक्का न पोहोचवता इमारत तोडण्याचे काम सुरू आहे.

बी वाँर्ड सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही इमारत तोडण्यात येत आहे. ही इमारत तोडताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. रेल्वे लगत ही इमारत येते. पण रेल्वेकडून कुठलेच सहकार्य मिळाले नाही असे उदयकुमार शिरुरकर यांनी सांगितले. उदय शिरुरकर यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे अनधिकृत बांधकामांना चाप बसला आहे.

Loading Comments