वांद्रे - गुरुवारी वांद्रयातल्या महाराष्ट्रनगर इथल्या 27 धोकादायक झोपड्यांवर हातोडा पडला. पालिकेच्या सर्वेक्षणानुसार इथल्या एक हजार झोपड्या 14 फुटांपेक्षा उंच आहेत. त्यापैकी 320 झोपड्या तीन-चार मजल्यांच्या असल्याचं निर्दशनास आलंय. त्यानुसार या 27 झोपड्यांचे मजले पाडण्यात आल्याची माहिती एच पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचं पालिकेकडून सांगितलं जातंय.