Advertisement

लालबागचा राजा मंडळाला महापालिकेकडून 3 लाखांचा दंड

मुंबई महापालिकेकडून तब्बल 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लालबागचा राजा मंडळाला महापालिकेकडून 3 लाखांचा दंड
SHARES

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) मुंबई महापालिकेकडून (Mumbai Mahanagar Palika) तब्बल 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) कालावधीत रस्त्यांवर पाडलेल्या खड्ड्यांसाठी लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला दंड आकारण्यात आला आहे.

मनपानं 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. मंडळानं गणेशोत्सवात मंडप बांधण्यासाठी फुटपाथवर 53 तर रस्त्यावर 150 खड्डे खोदले होते. त्यासाठी हा दंड आकारण्यात आल्याचं मुंबई महापालिकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

गणेशोत्सवादरम्यान, मुंबईतील गणेशोत्सव मंडळ दरवर्षी मंडप बांधण्यासाठी मुंबई महापालिकेकडून परवानगी घेतात. त्यानंतरच मंडप बांधण्यासाठी परवानगी मिळते. अनेक मंडळ मंडप बांधण्यासाठी रस्त्यांवर खड्डे खणतात.

तसेच, काही ठिकाणी फुटपाथवरील पेवरब्लॉक हटवून त्याठिकाणी खड्डे खणून मंडपाचे खांब रोवले जातात. गणेशोत्सवानंतर यासर्व गोष्टींचा आढावा महापालिकेकडून घेतला जातो. त्यानंतर ज्या-ज्या मंडळांनी रस्ते आणि फुटपाथची नासधूस केली आहे. त्या मंडळांना दंड आकारला जातो.

गणेशोत्सवानंतर नियमाप्रमाणे, महापालिकेकडून खड्डे बुजवण्याची जबाबदारी मंडळावर सोपवण्यात आली आहे. मात्र, गणेशोत्सवानंतर अनेक दिवस उलटून गेले तरिही लालबागचा राजा मंडळाकडून खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. हे खड्डे वेळीच बुजवलेले नसल्यानं महापालिकेनं मंडळाला 3 लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.



हेही वाचा

मास्क न घालणाऱ्यांकडून दंड वसूली का? भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा