Advertisement

मुंबईला डेंग्यूमुक्त करण्यासाठी BMC घेणार अॅपची मदत

डेंग्यू विरुद्ध मुंबई (मुंबई अगेन्स्ट डेंग्यू) असे या अॅपचे नाव आहे.

मुंबईला डेंग्यूमुक्त करण्यासाठी BMC घेणार अॅपची मदत
SHARES

मुंबईकरांकडून डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. हा अनुभव लक्षात घेऊन आता महापालिका प्रशासनाने अॅपची मदत घ्यायचे ठरवले आहे. डेंग्यू विरुद्ध मुंबई (मुंबई अगेन्स्ट डेंग्यू) असे या अॅपचे नाव आहे.

अॅपमध्ये काय माहिती? 

पावसाचे वा इतर कोणत्याही स्वरूपातील पाणी साचू नये, यासाठी कोणत्या वस्तू घर, परिसरांतून काढून टाकाव्यात, याची माहिती.

तसेच पाणी साचू शकतील वा डासांची उत्पत्ती होईल, अशा ठिकाणी वस्तू वा पाणी साठवलेले आहे का याची चाचणी करण्यासाठी अठरा प्रश्न दिलेले आहेत. त्याची उत्तरे द्यायची आहेत. उत्तरे दिल्यानंतर गुणांकन कमी आले तर संबधित व्यक्ती वा सोसायटीला राहत्या जागी डेंग्यूची उत्पत्तीस्थळे असल्याचे स्पष्ट होईल. जेणेकरून प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी मदत होऊ शकेल.

पावसाळ्यात भंगार वस्तू, टायर, तारापॉलीन काढण्यासाठी तसेच आवश्यक त्या ठिकाणी उपचारासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची नेमणूकही करता येणार आहे.

सर्व सोसायट्या तसेच व्यापारी संकुलांना त्यांच्या आवारात डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे सूचना करण्यात आल्या आहेत.

डेंग्यू विरुद्ध मुंबई हे अॅप अँड्राईड आणि आयओएस फोनवर उपलब्ध झाले आहे. मुंबईकरांना आपापल्या घर आणि परिसरात, तसेच कामाच्या ठिकाणी अंतर्गत उत्पत्तीस्थळांबाबतची माहिती देऊन जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे अॅप तयार करण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करता याव्यात, यासाठी ही माहिती दिली जाणार आहे.



हेही वाचा

मुंबई, पालघर आणि ठाण्यासाठी 7 आणि 8 सप्टेंबरसाठी यलो अलर्ट जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा