Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मुसळधार पावसासाठी महापालिका आपत्कालिन यंत्रणा सज्ज


मुसळधार पावसासाठी महापालिका आपत्कालिन यंत्रणा सज्ज
SHARES

उत्तर कोकणात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यामुळे या कालावधीत मुंबईतही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संभाव्य अतिवृष्ठीचा धोका लक्षात घेऊन महापालिकेची आपत्कालिन यंत्रणा सज्ज झाली आहे. या कालावधीतील खातेप्रमुखांच्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून यासर्वांना आपापल्या भागांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


आणीबाणी पथके सज्ज

या मुसळधार पावसाच्या कालावधीत महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत रिफ्लेक्टिव्ह जॅकेट्ससह मनुष्यबळ, यंत्रसामुग्री सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अग्निशमन नियंत्रण कक्ष, तटरक्षक दल, दोन्ही रेल्वे नियंत्रण, बेस्ट नियंत्रण कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष, वाहतूक पोलीस नियंत्रण कक्ष आदी नियंत्रण कक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना करून महावितरण, रिलायन्स एनर्जी, बेस्ट, यांना त्यांची आणीबाणी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाने स्पष्ट केलं आहे.

 

महापालिकेचे निर्देश

२४ आणीबाणी मदत यंत्रणांपैकी आवश्यक असलेल्या यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना गुरुवारपासूनच मुख्य आपत्कालिन नियंत्रण कक्षात उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबरच २४ विभागातील तात्पुरते निवारे म्हणून घोषित करण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळा काळजीवाहू कर्मचाऱ्यांसह सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 


आपत्ती प्रतिसाद पथक तैनात

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची प्रत्येकी एक तुकडी शहर भागासाठी परळ येथे, पश्चिम उपनगरासाठी अंधेरी क्रीडा संकुन आणि पूर्व उपनगरांत मानखुर्द अग्निशमन केंद्रात पूर बचाव साहित्यासह गुरुवारपासून तैनात करण्यात येणार आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा