महापालिकेला अखेर जाग आली...

 Kurla
महापालिकेला अखेर जाग आली...
महापालिकेला अखेर जाग आली...
महापालिकेला अखेर जाग आली...
See all

कुर्ला - नेहरूनगर भागातले रस्ते दुरुस्त करण्याचं काम मुंबई महानगरपालिकेकडून अखेर सुरू करण्यात आलंय. या भागातल्या खराब रस्त्यांमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. पावसाळ्यात अनेकदा या रस्त्यांवर पाणीही साचत असल्यामुळे रहिवासी त्रस्त होते. स्थानिक रहिवासी प्रदीप मौर्य यांनी या संदर्भात सांगितलं की, 'बऱ्याच काळानंतर महापालिकेनं आमच्या या अडचणींची दखल घेतली आहे. रस्ता दुरुस्तीचं काम सुरू झाल्यामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे.'

Loading Comments