Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

अनधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेचा दणका


अनधिकृत फेरीवाल्यांना महापालिकेचा दणका
SHARES

मुंबई - रस्त्यावर ठेला वा गाडी लावून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या एक लाखांहून अधिक अनधिकृत फेरीवाल्यांना मुंबई महानगरपालिकेने दणका दिला आहे. 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या सहा महिन्यांच्या काळात 1 लाख 12 हजार अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात पालिकेने कारवाई केली असून, त्यांच्याकडून तब्बल 30 कोटी 59 लाख 33 हजार 501 रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच या कारवाईतून पालिकेने तब्बल 2 कोटी 3 लाख 55 हजार 344 रुपये इतका दंडही वसूल केला आहे.

पालिकेने केलेल्या या कारवाईची अधिक आकडेवारी अशी -

-1 लाख 12 हजार 651 अनधिकृत विक्रेत्यांविरोधात कारवाई
- नाशवंत पदार्थांची विक्री करणारे 35 हजार 928 तर नाशवंत नसलेल्या पदार्थांची विक्री करणाऱ्या 50 हजार 336आणि 20 हजार 72 अनधिकृत खाद्यपदार्थ विक्री करणारे अशा 1 लाख 12 हजार विक्रेत्यांवर कारवाई
-2 कोटी 3 लाख 55 हजार 344 रुपयांची दंडवसुली
-5 हजार 160 हातगाड्या जप्त
- 1044 सिलिंडर जप्त
- 57 टेबल, स्टाॅल जप्त
- 24 उसाचे चरक जप्त
-जी उत्तर विभागात सर्वाधिक 13 हजार 173 अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई
-त्याखालोखाल ए विभागात 8 हजार 56 तर आर विभागात 6 हजार 248 फेरीवाल्यांविरोधात कारवाई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा