कांदिवलीत अतिक्रमणांवर पालिकेचा बडगा

 Kandivali
कांदिवलीत अतिक्रमणांवर पालिकेचा बडगा
कांदिवलीत अतिक्रमणांवर पालिकेचा बडगा
See all

कांदिवली - महापालिकेनं या भागात सुरू केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 250 अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. त्याचबरोबर परिसरातल्या अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करण्यात आलीय. आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव गायकवाड यांनी ही माहिती दिली.

परिमंडळ ७चे उपायुक्त अशोक खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आर दक्षिण विभागात सोमवारी पश्चिम परिसरातील महात्मा गांधी मार्ग, मथुरादास मार्ग आणि शांतीलाल मार्ग या रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामं तोडण्यात आली. तर, मंगळवारी पूर्वेकडील ठाकूर गाव, ठाकूर कॉम्प्लेक्स, आशानगर मार्ग या भागांत कारवाई झाली. या कारवाईसाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Loading Comments