Advertisement

आता शिवाजी पार्क देखभालीची कंत्राटदारावर जबाबदारी

पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने कंत्राटदार नेमण्याकरिता निविदा मागवल्या आहेत.

आता शिवाजी पार्क देखभालीची कंत्राटदारावर जबाबदारी
SHARES

शिवाजी पार्कची देखभालही व्यवस्थित व्हावी याकरिता पालिकेच्या जी उत्तर विभाग कार्यालयाने कंत्राटदार नेमण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. स्थानिक रहिवाशांच्या समितीच्या देखरेखीखालीच ही कामे करण्यात येणार आहेत.

शिवाजी पार्क मैदानाच्या देखभालीसाठी पालिकेने प्रथमच कंत्राटदार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कमधील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी पालिकेने मैदानात हिरव्या गवताची पेरणी केली असून मैदानाचा कायापालट केला आहे.

दादर इथल्या छत्रपती शिवाजी पार्क उद्यानाच्या तब्बल ९८ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या मैदानाच्या देखभालीसाठी आता तीन वर्षांकरिता कंत्राटदार नेमण्यात येणार आहे. त्याकरिता २ कोटी ९७ लाख रुपये खर्च अपेक्षित असून पालिकेनं निविदा मागवल्या आहेत.

पालिकेनं या मैदानाचा कायापालट केला आहे. मैदानात हिरव्या गवताची पेरणी करण्यात आली आहे. तसंच ३६ कूपनलिका खोदून पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. सध्या मैदानाचा पन्नास टक्के भाग गवतानं हिरवागार झाला आहे. मे महिन्यापर्यंत संपूर्ण मैदान हिरवेगार होणार आहे.

माळी, पंप चालवणारे, सफाई कामगार तसंच विविध यंत्रसामुग्री असेल. दररोज गवतावर पाण्याची फवारणी करणे, वाढलेले गवत कापणे, सभा किंवा समारंभानंतर मैदान पूर्ववत करणे ही जबाबदारी या कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. कंत्राटदारावर लक्ष ठेवण्यासाठी रहिवाशांची समितीही नेमण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा

शिवाजी पार्क मैदानातील 'तो' रस्ता वादाच्या भोवऱ्यात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा