Advertisement

अंधेरीतील ‘पोस्ट हाऊस’ स्टुडिओवर पालिकेचा हातोडा


अंधेरीतील ‘पोस्ट हाऊस’ स्टुडिओवर पालिकेचा हातोडा
SHARES

अंधेरीतील वी.रा. देसाई  मार्गावरील सत्यदेव प्लाझा इमारतीतील गोदामाच्या जागेत उभारलेल्या ‘पोस्ट हाऊस’ नावाच्या अनधिकृत स्टुडिओवर महापालिकेच्यावतीनं हातोडा चालवण्यात आला. पालिकेची परवानगी न घेतल्यामुळे या अनधिकृत स्टुडिओला महापालिकेने मागील वर्षी नोटीस बजावली होती. या नोटीसीवर न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवल्यानंतर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे.


अनधिकृत रेकॉर्डिंग स्टुडिओ

अंधेरी पश्चिम परिसरातील वी.रा देसाई मार्गालगत 'सत्यदेव प्लाझा' ही इमारत असून या इमारतीच्या तळघरामध्ये ‘पोस्ट हाऊस’ या नावाचा अनधिकृत रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरु होता. हा स्टुडिओ इमारतीच्या स्टोरेजच्या जागेत उभारण्यात आला होता. जागेचा वापर अनधिकृतपणे केला जात असल्याने महापालिकेच्या विभाग कार्यालयाद्वारे मागील वर्षी नोटीस दिली होती. नोटिसीविरोधात स्टुडिओच्या मालकाने न्यायालयात आव्हान देत याला स्थगिती मिळवली होती. मात्र, ही स्थगिती उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच उठवली. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम मुंबई पोलिसांच्या सहकार्याने तोडण्यात आल्याची माहिती ‘के पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली आहे.


२५ जणांचं पथक

इमारतीच्या स्टोरेजच्या जागेत उभारण्यात आलेल्या या स्टुडिओमध्ये साऊंड रेकॉर्डिंग, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, व्हिज्यूअल प्रोमोज, ओडिओ-व्हिडिओ एडिटिंग आदींची व्यवस्था होती. परिमंडळ ४ चे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३ हजार चौरस फुटांच्या जागेत उभारलेल्या या अनधिकृत स्टुडिओवर कारवाई करण्यात आली. महापालिकेचे १५ कर्मचारी-अधिकारी यांच्यासह १० पोलिस या कारवाईत सहभागी झाले होते.



हेही वाचा - 

वाशीच्या रघुलीला मॉलध्ये सिलिंगचा भाग कोसळला

माटुंगा स्थानकाचंही नाव बदलण्याची मागणी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा