Coronavirus Updates: महापालिकेतील हजारो आरोग्यसेविकांना हवा विमा

मुंबई महापालिकेतील हजारो आरोग्य सेविकांनाही हे विमा संरक्षण दिलं जावं, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

Coronavirus Updates: महापालिकेतील हजारो आरोग्यसेविकांना हवा विमा
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अर्थमंत्र्यांनी विविध घोषणा केल्या. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, अंगणवाडी व आशासेविकांना करोनाशी लढण्यासाठी ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण देण्यात आले आहेत. त्यानुसार, मुंबई महापालिकेतील हजारो आरोग्य सेविकांनाही हे विमा संरक्षण दिलं जावं, अशी मागणी कामगार संघटनांनी केली आहे.

मुंबई महापालिकेत ४ हजार आरोग्य सेविका काम करत असून, त्या करोनाच्या साथीत घरोघरी जाऊन चाचणी व तपासणीचं काम करित आहेत. त्यामुळं त्यांच्या आरोग्यालाही धोका आहे. आरोग्यसेविकांना विम्याचं संरक्षण दिलं नाही. करोना विरूद्धच्या लढ्यात भाग घेणं शक्य होणार नाही, असा इशारा देत विम्याचं संरक्षण जाहीर करावे, अशी मागणी महापालिकेकडं करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका आरोग्य सेविका संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडं एका पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यामुळं आता पालिकेतील या कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा -

महिंद्रा देणार फक्त ७५०० रुपयांत व्हेंटिलेटर्स!

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास सुरू राहणार, मुख्यमंत्र्यांची घोषणासंबंधित विषय