Advertisement

जुहूपाठोपाठ वर्सोवा चौपाटीही चकाचक

वर्सोवा चौपाटीच्या अस्वच्छतेवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर महापालिकेची बदनामी झाली होती. परंतु हे आव्हान स्वीकारून महापालिकेने अवघ्या काही दिवसांतच या चौपाटीची स्वच्छता करून टिकाकारांना तोंडात बोटं घालायला लावली आहे.

जुहूपाठोपाठ वर्सोवा चौपाटीही चकाचक
SHARES

मुंबईतील जुहू चौपाटीचा कायापालट केल्यानंतर महापालिकेने वर्सोवा चौपाटीचाही लूक बदलून टाकला आहे. वर्सोवा चौपाटीच्या अस्वच्छतेवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर महापालिकेची बदनामी झाली होती. परंतु हे आव्हान स्वीकारून महापालिकेने अवघ्या काही दिवसांतच या चौपाटीची स्वच्छता करून टिकाकारांना तोंडात बोटं घालायला लावली आहे. १२० कर्मचाऱ्यांद्वारे वर्सोवा चौपाटीची साफसफाई करण्यात येत असून या कामासाठी १ अत्याधुनिक 'बीच क्लिनींग मशीन' लवकरच आयात करण्यात येणार असल्याचंही महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
दररोज १३० मेट्रीक टन कचरा

वर्सोवा चौपाटीची एकत्रित लांबी सुमारे ४.५ किलोमीटर असून रुंदी सुमारे ३५ ते ६० मीटर आहे. वर्सोवा चौपाटीचं एकूण क्षेत्रफळ सुमारे २ लाख ३२ हजार ५०० चौरस मीटर एवढं आहे. महापालिकेच्या 'के पश्चिम' विभागांतर्गत येणाऱ्या वर्सोवा चौपाटीवर पावसाळ्यात दररोज सरासरी १३० मेट्रीक टन एवढ्या कचऱ्याची सफाई केली जाते. तर पावसाळ्या व्यतिरिक्त ८ महिन्यांत दररोज सुमारे ४५ मेट्रीक टन एवढा कचरा निघतो.


स्वच्छतेचं नियोजन कसं?

पावसाळ्या दरम्यानची साफसफाई व पावसाळ्या व्यतिरिक्त इतर कालावधीत करण्यात येणारी साफसफाईचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. यानुसार पावसाळ्याच्या काळात वर्सोवा चौपाटीवर दररोज किमान १०० कामगारांकडून साफसफाई करून घेण्यात येते. तर उर्वरित ८ महिन्यांच्या कालावधीत दररोज ५० कामगारांकडून साफसफाई करून घेण्यात येते.
किती खर्च?

तसंच 'बीच क्लिनींग मशीन'द्वारे साफसफाई करण्याची प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे न झाल्यास सदर दिवशी अतिरिक्त २० कामगार नेमण्यात येतात. यासाठी 'स्पेक्ट्रम इंजिनिअर्स प्रा. लि. या कंपनीची निवड झाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर या कंपनीला कार्यादेश दिल्यावर त्यांनी या कामाला सुरुवात केली आहे. पुढील ६ वर्षे या संस्थेकडे वर्सोवा चौपाटीच्या दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी असेल. यासाठी सुमारे २२.२४ कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे.

या दैनंदिन सफाईला सुरुवात झाल्यामुळे वर्सोवा चौपाटीचा लूक बदलला आहे. अत्याधुनिक 'बीच क्लिनींग मशीन' व्यतिरिक्त २ कॉम्पॅक्टर, २ ट्रॅक्टर इत्यादींसह आवश्यक ते साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करुन घेत सफाई केली जात असल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) विश्वास शंकरवार यांनी दिली आहे.हेही वाचा-

डेब्रिजची विल्हेवाट लावण्यास असमर्थ, ३० ते ४० बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस

तिवरांना नवसंजीवनी! १००० चौ. मीटरचा परिसर राहणार सीआरझेड-१ मध्येचRead this story in हिंदी
संबंधित विषय