Advertisement

पालिका रुग्णालयातील मृतदेहांवर महापालिकेच्याच खर्चाने कफन


पालिका रुग्णालयातील मृतदेहांवर महापालिकेच्याच खर्चाने कफन
SHARES

मुंबई महापालिकेकडून रुग्णालयांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले, तरी मृतदेहासाठी लागणारा पांढरा कपडा (कफन) हे नातेवाईकांनाच आणून देण्याची सक्ती केली जाते. परंतु, यापुढे रुग्णालयाकडूनच कपडा उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये मृतदेह पांढऱ्या कपड्यात गुंडाळूनच नातेवाईकांच्या ताब्यात देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


नातेवाईकांनाच आणावा लागायचा कपडा

मृतांवर अंत्यसंस्कारासाठी लागणारी जळाऊ लाकडेही महापालिकेकडून मोफत पुरवली जातात. मात्र, महापालिकेच्या रुग्णालयात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना मृतदेह गुंडाळण्यासाठी पांढरा कपडा आणण्याची मागणी आत्तापर्यंत केली जायची. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी एप्रिल २०१४मध्ये ठरावाची सूचना मांडून पांढरा कपडा रूग्णालयातच उपलब्ध करून देण्याची मागणी कली होती.


दोन वर्षांकरिता कपड्यांची खरेदी

अखेर हा कपडा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांकरता या पांढऱ्या कपड्याची खरेदी केली जात आहे. जुलै २०१६ ते जुलै २०१८ या कालावधीसाठी ही खरेदी केलेली असून यामध्ये दोन आकारांचा कपडा खरेदी केला जात आहे. रुग्णालय स्तरावर हा कपडा खरेदी करण्यासाठी अनुसूची बनवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व महाविद्यालयाचे संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. एक वर्षापासून याची अंमलबजावणी सुरु झाली असून याचे दर मध्यवर्ती खरेदी खात्याकडून निश्चित करून घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा