Advertisement

पावसाळ्यात मुंबईकरांना हवामाना संदर्भातील अपडेट SMS वर मिळणार

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या विविध यंत्रणांची बैठक पार पडली.

पावसाळ्यात मुंबईकरांना हवामाना संदर्भातील अपडेट SMS वर मिळणार
SHARES

येत्या पावसाळ्यात मुंबईकरांना हवामाना संदर्भात महत्त्वाचे अपडेट SMS द्वारे दिली जाणार आहेत. एखाद्या भागात हवामानविषय़क काही माहिती देण्याची आवश्यक्ता भासली तर अॅपचा वापर केला जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली दिली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या विविध यंत्रणांच्या आज झालेल्या समन्वय बैठकीत ते बोलत होते. मुंबई शहर आणि उपनगरात पाणी साचणाऱ्या ४८० ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप लावण्यात येणार आहेत. 

उपनगरीय लोकल सेवा गेल्यावर्षीप्रमाणे सुरळीत राहील यासाठी काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळी आजारांसाठी महानगरपालिकेकडून ३ हजार रूग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या असल्याच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे ३ चमू सज्ज असणार आहेत. धोकादायक इमारतींसाठी मोहीम राबवून नोटीस बजावण्याच्या तसेच रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. दरडी कोसळण्याच्या ठिकाणी उपाययोजना  करण्याचे निर्देश ही चहल यांनी दिले.



हेही वाचा

मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना कारावा लागण्याची शक्यता

विकेंडला खडकवासला धरणावर जायचा प्लॅन करताय? मग 'हे' वाचाच

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा