'रईस बाप की बिगड़ी हुई औलाद'

मुंबई - पालिका निवडणूक जवळ आल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींनी जोर धरलाय. आता तर थेट मुंबई महानगर पालिका कारभारावरच भाजपा नेते हल्ला चढवताना दिसतायेत. काही दिवसांपूर्वीच भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महानगर पालिका म्हणजे माफिया राज असं म्हणत मित्रपक्षावर जोरदार टीका केली होती. आता तर भाजपाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य दिलीप पटेल यांनी शिवसेनेच्या वर्मावरच घाव घातलाय.

सत्तेत मांडीला माडी लावून बसलेले सत्ताधारी एकमेकांवर टीका करत असताना मग विरोधक तरी कसे गप्प बसतील. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी तर भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना टार्गेट करत भाजपाला उशिरा शहाणपण सुचल्याचे म्हणत खिल्ली उडवली.

निवडणुकीचे वातावरण जसं तापेल तसा प्रत्येक पक्ष एकमेंकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल. मात्र केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असणारे एकमेकांना खोल पाण्यात पाहत असतील तर मग विरोधकांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतलं तर आश्चर्य वाटायला नको.

Loading Comments