Advertisement

ख्रिसमस आणि नव वर्षासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा धोका सध्या वाढत आहे. अधिक रुग्ण आढळत असून, आता महापालिका सतर्क झाली आहे.

ख्रिसमस आणि नव वर्षासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जारी
SHARES

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनचा धोका सध्या वाढत आहे. अधिक रुग्ण आढळत असून, आता महापालिका सतर्क झाली आहे. राज्यात २ दिवसांपूर्वी ऑमिक्रॉनच्या ८ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४ रुग्ण मुंबईचे, ३ साताऱ्याचे आणि १ पुण्याचा आहे.

ऑमिक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्यानं मुंबई महापालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. लोकांनी गर्दी टाळावी असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला आहे. 

ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळावी असं आवाहन पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी केलं आहे.

पालिकेची नियमावली

  • बंद हॉलमधील कोणत्याही कार्यक्रमात हॉलच्या ५० टक्के क्षमतेहून अधिक लोकांना परवानगी नसेल. 
  • खुल्या जागेवर कार्यक्रम घेताना क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी असेल.
  • एखाद्या कार्यक्रमाला १ हजारहून अधिक जण येणार असतील, तर त्यासाठी स्थानिक आपत्ती निवारस प्रशासनाची परवानगी गरजेची असेल.
  • सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह, मॉल आणि अन्य सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना उपस्थितीशी संबंधित नियमांचं पालन काटेकोरपणे करावं लागेल.
  • सार्वजनिक वाहतुकीत आणि सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी असेल. 
  • नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.
  • सार्वजनिक ठिकाणं/ संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबतच कोणत्याही कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. 
  • नियम मोडणाऱ्या संस्थांविरोधात कारवाई केली जाईल.
  • मास्कचा वापर, वारंवार हात धुणं, फिजिकल डिस्टन्सिंग आवश्यक आहे.
  • सर्व परिसर, शौचालयांची नियमित सफाई आणि सॅनिटायझेशन गरजेचं आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा