Advertisement

कोविड 19 चाचणी वाढवणार पालिका, इमारतीत काटेकोरपणे कंटेन्ट झोन नियम लागू करणार

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीलबंद इमारतींमधील कंटमेंट झोनबाबतचे नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोविड 19 चाचणी वाढवणार पालिका, इमारतीत काटेकोरपणे कंटेन्ट झोन नियम लागू करणार
SHARES

मुंबईची नागरी संस्था, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील सीलबंद इमारतींमधील कंटमेंट झोनबाबतचे नियम कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाय, पालिकेची दररोज चाचणी वाढवून १६ हजार ते १८ हजार  चाचण्या करण्याची योजना आहे. सध्या दररोज १५ हजार चाचण्या होतात. यासंदर्भात बुधवारी  पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सर्व सहाय्यक आयुक्त, विभागीय उपायुक्त नगरपालिका आयुक्त, महानगरपालिका रुग्णालयांचे डीन आणि नागरी संस्थेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात नवीन निर्देशांचे अधिकार दिले.

नवीन नियमांनुसार, सर्व निवासी इमारतींतील मदतनीस आणि ड्रायव्हर, सफाई कामगार, घरगुती सुरक्षा कर्मचारी यासारख्या गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रवेश असलेल्या इतर कर्मचार्‍यांची तपासणी करावी लागेल. केवळ दोन किंवा अधिक मजल्यावरील प्रकरणं असल्यास किंवा १० हून अधिक प्रकरणं असल्यास संपूर्ण इमारत सील करण्याचा सध्याचा नियम कायम आहे.  इमारत सीलबंद झाल्यास कोणीही बाहेर पडणार नाही किंवा प्रवेश करणार नाही.

दरम्यान, बुधवारी मुंबईत कोरोनाव्हायरसची २ लाख ६५ हजार ६५४ रुग्ण नोदंवली गेली. यापूर्वी बुधवारी, मिशन बिग अगेन उपक्रमाचा एक भाग म्हणून राज्य सरकारनं बंदी कमी करण्याबरोबरच ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवला होता. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात राज्य सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट व बार यांना जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेसह सेवा पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. 



हेही वाचा

कोरोनावरील लस देण्यासाठी पालिकेच्या नियोजन आखणीस सुरुवात

महापालिकेच्या 'या' विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा