Advertisement

महापालिकेच्या 'या' विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक

सप्टेंबरपासून या भागातही वेगाने रुग्ण वाढू लागले आहेत.

महापालिकेच्या 'या' विभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक
SHARES

मागील काही दिवसांपासून सांताक्रूझ (Santakruz), खार (Khar), वांद्रे (Bandra) परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. वांद्रे, खार, सांताक्रूझचा भाग असलेल्या एच पश्चिम भागात करोना बऱ्यापैकी नियंत्रणात होता. मात्र सप्टेंबरपासून या भागातही वेगाने रुग्ण वाढू लागले आहेत.

सध्या या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या बोरिवली, अंधेरी या भागांच्या तुलनेत निम्मी असली तरी रुग्णवाढीचा वेग चिंतेची बाब आहे. काहीसा उच्चभ्रू भाग असलेल्या या भागांतही गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी सरासरी १०० रुग्णांची नोंद होत आहे.

गेल्या आठवड्यात ६५५ रुग्णांची यात भर पडली. सध्या या भागात ६९५० एकूण बाधित आहेत. त्यापैकी १२०७ रुग्ण उपचाराधीन आहेत. एखादा रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या निकट संपर्कातील लोकांचा शोध वेळीच घेण्याची मोहीम तीव्र केल्यामुळे अगदी नवीन म्हणजेच ‘इंडेक्स’ रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाल्याचं समजतं.

वांद्रे, खार परिसरात रहिवाशांच्या संघटना सक्रिय आहेत. कोरोना आटोक्यात आणण्याच्या कामी त्यांचीही मदत घेतली जात आहे. या भागातील एकूण रुग्णसंख्येपैकी ९५ टक्के रुग्ण इमारतीत राहणारे आहेत. सध्या या भागात झोपडपट्टीचा भाग असलेली केवळ चार प्रतिबंधित क्षेत्रे आहेत, तर ४३४ इमारती प्रतिबंधित आहेत.

जे नवीन रुग्ण आढळून येत आहेत, ते आधीच्या रुग्णांच्या निकट संपर्कातीलच आहेत. त्यामुळे पुढचा धोका टळावा यासाठी खबरदारी घेतली जात आहे. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा