Advertisement

कोरोनावरील लस देण्यासाठी पालिकेच्या नियोजन आखणीस सुरुवात

लस उपलब्ध झाल्यावर त्याचं वितरण कशा पद्धतीनं आणि कुठल्या निकशाद्वारे करता येईल, यासंदर्भात पालिका अधिकारी चर्चा करत आहे.

कोरोनावरील लस देण्यासाठी पालिकेच्या नियोजन आखणीस सुरुवात
SHARES

कोरोनाव्हायरसची लस विकसित करण्याचं काम वेगानं सुरू आहे. भारतात पुढच्या वर्षी जुलैमध्ये ही लस उपलब्ध होऊ शकते. लस उपलब्ध झाल्यावर त्याचं वितरण कशा पद्धतीनं आणि कुठल्या निकशाद्वारे करता येईल, यासंदर्भात पालिका चर्चा करत आहे. यासाठी पालिका नियोजन आखत आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता कमीतकमी काही महिने तरी लस उपलब्ध होईल याची आशा कमीच आहे.

महानगरपालिकेच्या अंदाजानुसार भारताचं लोकसंख्या १.३० कोटी आहे. त्यापैकी ३० टक्के लोकसंख्येत आरोग्यसेवा कर्मचारी, अग्रभागी कर्मचारी तसंच ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना पहिलं प्राधान्य देणं गरजेचं आहे. या लसीचं वितरण करण्यासाठी शहरातील खासगी आणि प्रशासकिय रुग्णालयांची मदत महापालिका घेईल, असं सांगितले जात आहे. नागरी संस्था लसी पाठविण्यासाठी क्लिनिक, आरोग्य केंद्रे आणि प्रसूतीगृहात स्थापित वितरण नेटवर्कचा लाभ घेईल.

ऑक्टोबरच्या अखेरीस पालिकेच्या ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’च्या घराघरात सर्वेक्षण संपल्यानंतर लस वितरणासाठी रणनीती तयार केली जाईल. नागरी संस्थेनं कोरोनाव्हायरसच्या लक्षणांसाठी नागरिकांची तपासणी आधीच केली आहे. तसंच येत्या काही महिन्यांपासून सुरक्षितता मार्गदर्शक तत्त्वे देखील उपलब्ध करून दिली आहेत.

डोर-टू-डोअर सर्वेक्षणानं पालिकेला COVID 19 मधील अनेक ज्येष्ठ नागरिकांची ओळख पटवण्यात मदत झाली. तर अनेकांना ऑक्सिजन थेरपी कमी ऑक्सिजन पातळीचा प्रतिकार करण्यासाठी वापरण्याची शिफारस केली गेली. या सर्वेक्षणातून सुमारे दहा लाख ज्येष्ठांची तपासणी करण्यात आल्याची माहिती नागरी संस्थेनं दिली आहे.

महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, “लस येण्यास थोडा वेळ लागेल, पण‘ माझे कुटुंब-माझी जबाबदारी ’कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही नोव्हेंबरपासून आपले नियोजन सुरू करू. सर्वेक्षणानुसार त्या व्यक्तीचा डेटा देईल ज्यांना प्रथम लस घेणं आवश्यक आहे. तर इतर वयो गटांसाठी नियोजन आठवड्यातून केलं जाऊ शकतं. जेव्हा जेव्हा ही लस येते तेव्हा आम्ही आमच्या नागरीक आरोग्य सुविधा आणि खासगी आरोग्य सेवा संस्थांच्या मदतीनं १५ दिवसांच्या आत लस देऊ शकतो.”

राज्य आणि केंद्रीय अधिकाऱ्यांनी नवीन मार्गदर्शक सूचना प्रकाशित केल्यामुळे लस वितरणासाठीचे धोरण बदललं जाईल, असं नागरी संस्थेनं म्हटले आहे. सध्या, ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमधील लसीची चाचणी मुंबईतील केईएम रुग्णालयात सुरू आहे. फार्मा दिग्गज अ‍ॅस्ट्रॅजेनेका देखील या विशिष्ट लसीच्या विकासात सामील आहे.



हेही वाचा

भविष्यात मिरा भाईंदर, घोडबंदर व दहिसर एकमेकांना जोडणार

४१ ते ६० वयोगटातील रहिवाशांना कोरोनाचा जास्त फटका

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा