Advertisement

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा कृती आराखडा


प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेचा कृती आराखडा
SHARES

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचवलेल्या उपाययोजनांप्रमाणे महापालिकेने आपला कृती आराखडा बनवला आहे.
जैविक कचरा, पाचापोचाळा, पिंकांची खुंट, जाळून होणाऱ्या प्रदूषणाचा विचार या कृती आराखड्यात करण्यात आला असून हा आराखडा मंजूर झाल्यानंतर वायू प्रदूषण नियंत्रणाबाबत ठोस उपाययोजना अंमलात आणल्या जातील, असे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील हवेत पोलेन, मोफेड, सोपर्स धूळ, सिमेंट धूळ इत्यादी धुलिकणांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणांस आळा घालता येईल, अशा रितीने संपूर्ण मुंबईत प्रदूषण नियंत्रके बसवण्याची मागणी प्रशासनाकडे होत आहे.

काँग्रसेच्या माजी नगरसेविका संगिता हंडोरे यांनी ठरावाच्या सूचनेही ही मागणी करत याबाबत चिंता व्यक्त केली होती. वाढलेल्या वाहतुकीच्या प्रदूषणामुळे हवेतील धुलीकणांमध्ये वाढ झाली असून हे धुलीकण आरोग्यास बाधक ठरत असतात. यामुळे दम्यासारखे श्वसन विकाराचे आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, असे त्यांनी म्हटले होते.

वायू प्रदूषण नियंत्रणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुचवलेल्या उपाय योजनाबाबत कृती आराखडा तयार करण्यात आल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने स्पष्ट केले. त्या अनुषंगाने महापालिकेच्या इमारत प्रस्ताव, घनकचरा व्यवस्थापन , उद्यान, रस्ते व परिवहन इत्यादी विभागांना खात्याकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

यामध्ये वाहनांमार्फत उत्सर्जित होणारे प्रदूषण नियंत्रित करणे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावून हरित पट्टा निर्माण करणे, जैविक कचरा, पालापाचोळा, पिकांची खुंट जाळून होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण इत्यादी बाबींची कृती आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. हा कृती आराखडा मंजूर करण्यात आल्यानंतर याअंतर्गत ठोस उपाययोजा अंमलात आणल्या जातील, असे पर्यावरण विभागाने स्पष्ट केले.



हे देखील वाचा -

गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी - रामदास कदम



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा