Advertisement

गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी - रामदास कदम


गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी - रामदास कदम
SHARES

राज्यभरात गुढी पाडव्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी सांगितलं. प्लॅस्टिक पिशव्यांवरील बंदीसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रधान सचिव सतीश गवई, महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य सचिव पी. एन. अनबलगन आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्लॅस्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कोणत्या प्रकारच्या पर्यावरणपूरक पिशव्या बाजारात वापरता येतील, या बाबत अनेक संस्थाकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. याबरोबरच महिला बचतगटांनाही अनुदान देऊन त्यांच्याकडून कापडी पिशव्या घेण्याचं प्रस्तावित आहे. यासाठी त्यांना सबसिडी दिली जाईल. 

टप्प्याटप्याने राज्यातील महापालिकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही प्लॅस्टिकवर बंदी घालण्याबाबत सांगण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना नावीन्यपूर्ण योजनेसाठी दिलेल्या निधीतून काही निधी पर्यावरणपूरक गोष्टीसाठी खर्च करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असं यावेळी कदम यांनी सांगितलं.

प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरील बंदीसंदर्भात आकाशवाणी, दूरदर्शन, एफएम रेडिओ वरूनही प्रसिद्धी करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

राम शिंदे बालिश आणि खोटारडे - रामदास कदम



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा