• राम शिंदे बालिश आणि खोटारडे - रामदास कदम
SHARE

जलशिवार योजनेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या टीकेवरून राम शिंदे आणि रामदास कदम एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. काही दिवसांपूर्वी जलशिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे सांगून शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शिंदे यांच्यावर जाहीर टीका केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा रामदास कदम यांनी राम शिंदे यांना बालिश आणि खोटाराडे म्हणत त्यांना टोला हाणला आहे.

कदम यांच्या आरोपांवर खुलासा करताना मंगळवारी भाजपा नेते आणि जलसंधारणमंत्री राम शिंदे म्हणाले होते की, भ्रष्टाचाराची माहिती रामदास कदम यांनी पत्रकारांना सांगण्यापूर्वी संबधित मंत्र्यांना सांगितली असती तर आम्ही त्याची चौकशी केली असती. रामदास कदमही सरकारमध्ये सामील आहेत. भ्रष्टाचाराला पायबंद घालणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असते. जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री तर शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांना विश्वासात घेऊन ही बाब सांगायला पाहिजे होती.

राम शिंदे यांच्या व्यक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांनी शिंदे हे बालिश आणि खोटाराडे आहेत, अशी टीका केल्याने शिवसेना आणि भाजपा मंत्र्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या