अंधेरीत जलवाहिनी फुटली, स्थानिकांची गैरसोय


अंधेरीत जलवाहिनी फुटली, स्थानिकांची गैरसोय
SHARES

मुंबईतील अंधेरी वेरावली जलाशयाला पाणीपुरवठा करणारी भांडुप-मरोशी मुख्य जलवाहिनी पवई इथं फुटल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ही जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. तसंच, जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळं उपनगरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला.

दुरूस्तीचं काम

या दुरूस्तीच्या कामासाठी तसंत, जलवाहिनी फुटल्यामुळं घाटकोपर, अंधेरी, जोगेश्वरी, विलेपार्ले आदी भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, तर काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा करण्यात आला. जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच घटनास्थळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम पालिकेच्या जलअभियंता विभागाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं होतं. मात्र, त्यासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आला व नागरिकांना या प्रकाराची माहितीही मिळाली नाही.

कमी दाबानं पाणी

फुटल्याची तेथील स्थानिकांना माहिती नसल्यानं मोठी गैरसोय झाली. जोगेश्वरी परिसरात टँकरनं पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कमी दाबानं पाणी आलं.हेही वाचा -

मुंबई-पुणेदरम्यान तिसरी मार्गिका, घाटप्रवास होणार सुखद!

हात गमावलेल्या 'प्रिन्स'च्या पालकांनी पालिकेची मदत नाकारलीसंबंधित विषय