मागील २ महिन्यांपासून मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मार्गावर येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मुंबईहून पुण्याला जाताना प्रवाशांना घाट परिसरात गाडीमध्ये काही बिघाड झाल्यास मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं. त्यामुळं प्रवाशांच्या समस्यांवर मात करण्यासाठी मुंबई-पुणे प्रवास जलद व्हावा यासाठी मंकी हिलजवळील पुलाचा विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे.
मुसळधार
पावसात रुळ वाहून जाण्याच्या
समस्येवर तोडगा काढण्यासाठी
२ ठिकाणी संरक्षक भिंत रेल्वे
उभारणार आहे.
नव्या
वर्षात म्हणजेच १५
जानेवारीपर्यंत ही कामं पूर्ण
करण्यात येतील,
असा
दावा मध्य रेल्वेनं केला आहे.
दरम्यान,
सप्टेंबर-ऑक्टोबर
महिन्यांतील मुसळधार पावसामुळं
खंडाळा-मंकी
हिल,
ठाकूरवाडी-मंकी
हिल आणि मंकी हिल-नागनाथ
(पुणे)
या
३ मार्गांवरील रुळांचं मोठं
नुकसान झालं होतं.
मंकी
हिलपासून २ किलोमीटर अंतरावर
२ बोगदे सांधणारा पूल पावसात
वाहून गेला आहे.
त्यामुळं
पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या
मेल-एक्स्प्रेस
गाड्यांचा खोळंबा होत
आहे.
सद्यस्थितीत पुलावर २४.४ मीटरचे ६ भाग असून, पुलाची लांबी सुमारे १५० मीटर आहे. विस्तारीकरणानंतर सुमारे २० मीटर लांबीचे ३ भाग पुलाला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळं पुलाची एकूण लांबी २०० मीटरपेक्षा जास्त होणार आहे. पुलाच्या खांबांची पायाभरणी खोल खडकांत करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली.
मुंबई-पुणे मार्गावरील ३ रेल्वे मार्गिकांवरून रोज सुमारे १०० मेल-एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. सध्या २ मार्गिकांवरून वाहतूक सुरू आहे. पुण्याहून मुंबईकडं येणाऱ्या मार्गावर काम सुरू असल्यानं रोज २ मेल-एक्स्प्रेस पूर्णत: आणि ८ ते ९ मेल-एक्स्प्रेस अंशतः रद्द होत असल्याची माहिती मिळते.
हेही वाचा -
PMC बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, ठेवीदारांची हायकोर्टाबाहेर निदर्शने