Advertisement

झोपड्पट्टीच्या विळख्यातील मैदान झाले मुक्त


झोपड्पट्टीच्या विळख्यातील मैदान झाले मुक्त
SHARES

महापालिकेच्या के - पश्चिम विभागातील ओशीवरा गावठाणातील तब्बल १४ हजार चौरस मीटर जागेवर झोपड्यांनी गिळलेल्या मैदानाला मुक्त करण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. येथील अतिक्रमित 44 झोपड्यांवर कारवाई करत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. या झोपड्या तोडल्यामुळे या मैदानाला मोकळा श्वास मिळाला असून लवकरच हे मैदान मुलांना खेळण्यास खुले करून दिले जाणार आहे.

के - पश्चिम विभागातील ओशीवरा गावठाणात खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या 11 हजार चौरस मीटर (CTS No 563/B) आणि 3 हजार चौरस मीटर ( CTS No 563/A) या जवळ जवळ असलेल्या दोन भूखंडांवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते. या परिमंडळाचे उपायुक्त किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनात या विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी कारवाई केली. शनिवारी हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली. या कारवाईत त्यांनी 44 अनधिकृत बांधकामे तोडली आणि हे मैदान अतिक्रमण मुक्त केले. या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी तेथे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.

एकूण 14 हजार चौरस मीटर म्हणजेच तब्बल 1 लाख 45 हजार चौरस फूट असलेल्या या भूखंडावर मैदान विकसित करण्याचा प्रस्ताव लवकरच वरिष्ठांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, असे प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले. सहाय्यक उद्यान अधिक्षक जे. एम. भोईर, कनिष्ठ अभियंता प्रवीण पतके आणि इतर सहकाऱ्यांनी कारवाईत मोहिमेत महत्त्वाची भूमिका पार पडली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा