Advertisement

महापौरांचा विभाग कार्यालयांमध्ये आढावा बैठक: नगरसेवकच अनभिज्ञ


महापौरांचा विभाग कार्यालयांमध्ये आढावा बैठक: नगरसेवकच अनभिज्ञ
SHARES

पी/उत्तर आणि आर/दक्षिण विभाग कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभागातील नागरिकांनी मांडलेल्यास नागरी समस्यांचा आढावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी दुपारी संबंधित विभाग कार्यालयात उपस्थित राहून घेतला. तसंच या समस्या तात्काळ मार्गी लावल्या जाव्यात, असे निर्देश संबंधि‍त विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना दिले. परंतु, महापौरांच्या या आढावा बैठकीला शिवसेनेचे आजी आणि माजी नगरसेवक वगळता इतर पक्षांच्या एकाही नगरसेवकाला याची कल्पना देण्यात आली नाही. विशेष म्हणजे महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आढावा बैठकीत शिवसेनेचे विद्यमान मागे बसवून माजी नगरसेवकांना पहिल्या खुर्चीवर बसवत नगरसेवकांचा सन्मान राखला गेला नाही.

मालाड (पी/उत्तर) आणि कांदिवली (आर/दक्षिण) या भागातील नागरी समस्यांसंदर्भात महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला शिवसेना नगरसेविका संगिता सुतार, माजी नगरसेविका अनघा म्हात्रे, माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत, अजित भंडारी पी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे आणि आर/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

समस्या घेतल्या जाणून

मालाडमधील गावकरी पुजारी तलावामधील कारंजांची पुन्हा दुरुस्ती करणे, राजे शहाजी राजे क्रिडांगणाच्या विरुद्ध दिशेने असलेले तसेच नागरिकांच्या गैरसोयीच्या दृष्टीने असलेले सुलभ शौचालय इतरत्र हलवणे, मुंबई टॉकीज परिसरात असलेली विहिर पुन्हा सुरू करणे, डी मॉन्टेज मार्गावरील अतिक्रमण काढून या मार्गावर पर्जन्य जलवाहिनी टाकणं, मालवणी मार्गावरील खड्डे बुजवणे, कोळीवाड्यातील घरांचं नुतनीकरण करण्याची परवानगी देणं, सोमवारी बाजारातील अनधिकृत गाड्यांवरील कारवाई करणे, शिवाजी कॉम्‍प्लेक्समधील गटाराची साफसफाई करणं आदी समस्यांचा पाढा नागरिकांनी यावेळी महापौरांसमोर मांडला. या विभागाचे सहाय्यक आयुक्त संजोग कबरे यांनी याची नोंद घेऊन ज्याची समस्या तात्काळ निकाली काढणं शक्य‍ आहे, त्या तातडीनं सोडवण्यास प्राधान्य देणार असल्याचं आश्वासन महापौरांना दिलं.


या समस्या घेतल्या जाणून?

कांदिवली भागातील खजुराह टॅंक मार्गावरील बंद असलेले म्युझिक उद्यान पुन्हा सुरू करणं, ९० फुट रोडवरील लालजीपाडा परिसरातील बंद असलेला रस्ता पुन्हा सुरू करणं, बाणडोंगरी पोलिस रिक्षास्टँडजवळील कचरा तातडीनं उचलणं, सहयाद्रीनगर माथाडी कामगार वसाहतीमध्ये दुर्गंधयुक्त पाण्याची विल्हेवाट लावणं, अशोकनगर विभागातील विहिरींची साफसफाई करणं, ९० फूट मार्गावरील अतिक्रमणधारकांवर तातडीनं कारवाई करणं, सोलापूर मित्र मंडळाच्या बंद असलेल्यास पाणपोईच्या जागी समाजसेवा केंद्र सुरू करणं, बंदरपाखाडी भागातील नाल्यावर संरक्षक भिंत बांधणं, पोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणं, लोखंडवाला कॉप्लेक्समधील पिण्यांच्या पाण्यााची समस्या मार्गी लावणं आदी समस्यांचा पाढा नागरिकांनी यावेळी महापौरांसमोर मांडला. 

यावेळी कांदिवलीतील आर दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्तं संजय कुऱ्हाडे यांनी याची नोंद घेऊन समस्या तात्काळ निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असं आश्वासन महापौरांना दिलं.


महापौरांनी घेतली आढावा बैठक

मालाड आणि कांदिवली या दोन्ही प्रभाग समिती भाजपच्या ताब्यात असून तिथं भाजपचे नगरसेवक मोठ्यासंख्येने आहेत. या दोन्ही प्रभाग कार्यालयांमध्ये महापौरांनी जावून आढावा बैठक घेतली. परंतु, या दोन्ही प्रभागांच्या अध्यक्षांना तसंच इतर पक्षाच्या नगरसेवकांना साधे निमंत्रितही करण्यात आलं नाही की त्यांना याची कल्पना देण्यात आली नाही.


माजी नगरसेविकेला मान

महापालिकेच्या कार्यालयात येऊन महापौरांनी जनता दरबार पद्धतीने आढावा बैठक घेऊन केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्याच समस्या जाणून घेतल्या. परंतु, या आढावा बैठकीला उपस्थित असलेल्या एकमेव शिवसेना नगरसेविका सुतार यांनाही सन्मानानं पहिल्या खुर्चीवर बसण्याचा मान महापौरांनी दिला नाही. महापौरांच्या उपस्थित विद्यमान नगरसेविकेला मागे सारून माजी नगरसेविका अनघा म्हात्रेसह अन्य पदाधिकारी पुढे खुर्ची अडवून बसले होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा