पालिकेची तत्परता

 Lower Parel
पालिकेची तत्परता
पालिकेची तत्परता
See all

सातरस्ता - म्हाडा पुनर्विकास प्रकल्प रखडल्याने नळवाला इमारतीती मूळ रहिवाशी गेल्या नऊ वर्षापासून धोबी घाट इथल्या संक्रमण शिबिरात राहत आहेत. या संक्रमण शिबिराची अवस्था अत्यंत वाईट आहे. याबाबत रहिवाशांनी पालिकेला निवेदन दिले. त्यानंतर पालिकेनं दुसऱ्याच दिवशी तातडीनं म्हाडा आणि आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत धोबी घाट येथील संक्रमण शिबिरात भेट देऊन पाहणी केली. तसंच याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या वेळी स्थानिक रहिवाशी आणि स्थानिक आमदारही उपस्थित होते.

इमारतीच्या परिसरातील सांडपाणी आणि मलनिस:रण गटारं तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्यानं डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी वाढली होती. त्यामुळं तिथे अनेक रहिवाशी आणि शालेय विद्यार्थी कावीळ, मलेरिया, डेंग्यूसारख्या साथीच्या आजारानं त्रस्त झाले होते.

Loading Comments