Advertisement

मुंबईच्या अग्निशमन विभागात 97 महिलांची निवड


मुंबईच्या अग्निशमन विभागात 97 महिलांची निवड
SHARES

मुंबईकर महिलांसाठी नुकतीच मुंबईमध्ये एक अभिमानाची आणि आनंददायी गोष्ट घडली आहे. मुंबईच्या अग्निशमन विभागामध्ये नुकत्याच 97 महिलांची भरती करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे.

याआधी मुंबईच्या अग्निशमन विभागामध्ये फक्च 18 महिला कर्मचारी होत्या. मात्र पहिल्यांदाच अग्निशमन विभागाने एवढ्या मोठ्या संख्येने महिलांची निवड केली आहे, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी पी. रहांगदळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मुंबईच्या अग्निशमन विभागातील महिलांची संख्या 115 झाली आहे.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार यापैकी अनेक महिलांना लष्करी सेवेत जायचं होतं. पण काही कारणास्तव त्या जाऊ शकल्या नाहीत.

अग्निशमन विभागात भरती होत असल्याचं समजलं आणि मी लगेच अर्ज केला. आपल्या देशवासियांसाठी काहीतरी करण्याची माझी इच्छा होती.

कविता गुरुले, अग्निशमन कर्मचारी

नवीन भरती करण्यात आलेल्या महिला कर्मचाऱ्यांना वडाळ्याच्या रिजनल कमांड सेंटरमध्ये प्रशिक्षित केलं जात असून पुढील महिन्यात त्यांना पूर्णवेळ सेवेमध्ये घेतलं जाणार आहे. मुंबईतल्या एकूण 34 अग्निशमन केंद्रांवर या महिला कर्मचाऱ्यांना नियुक्त केलं जाणार आहे.


फोटो सौजन्य


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा