Advertisement

म्हणून महिला बचत गटांना नालेसफाईतून वगळलं

नालेसफाईचं काम करणाऱ्या बचत गटांमधील कंत्राटी कामगार भविष्यात आम्हाला सेवेत रुजू करून घ्या, अशी मागणी करतील याच भीतीने त्यांना नालेसफाईच्या कामांमधून बाहेर करण्यात आल्याचं समजतं.

म्हणून महिला बचत गटांना नालेसफाईतून वगळलं
SHARES

मुंबईतील छोट्या नाल्यांच्या सफाई कामांमधून यंदा महिला बचत गटांना हद्पार करण्यात आलं आहे. या महिला बचत गटांना कामाचा योग्य अनुभव नसल्यामुळे त्यांच्याऐवजी कंत्राटदारांनाच ही कामे दिली जात असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. पण, प्रत्यक्षात नालेसफाईचं काम करणाऱ्या बचत गटांमधील कंत्राटी कामगार भविष्यात आम्हाला सेवेत रुजू करून घ्या, अशी मागणी करतील याच भीतीने त्यांना नालेसफाईच्या कामांमधून बाहेर करण्यात आल्याचं समजतं.


कुठलं काम करायच्या?

मुंबईतील छोट्या नाल्यांच्या सफाईची कामे ही यापूर्वी महिला बचत गट संस्थाच्या माध्यमातून केली जायची. यासाठी कामगार उपलब्ध करून महिला बचत गट छोटे नाले तसंच रस्त्यांलगतच्या पेटीका नाल्यांची सफाई करायच्या. परंतु यावर्षी या छोट्या नाल्यांच्या सफाईतून महिला बचत गटांच्या संस्थांना वगळून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो महिला संस्थांच्या हातातील रोजगार गेला आहे.


आयुक्तांना भीती

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नालेसफाईच्या कामासाठी निवड केलेल्या महिला बचत गट संस्थांच्या कामगारांकडून महापालिका सेवेत रुजू करून घेण्याची मागणी होऊ शकते. याच भीतीने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या महिला बचत गटांच्या संस्थांना यावेळी काम न देण्याचा निर्णय घेतला घेतल्याचं समजतं.


स्थायीत वेगळंच कारण

महापालिकेच्या पर्जन्य विभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खणकर यांनी स्थायी समितीच्या सभेत या महिला बचत गटांच्या सफाई कामाचा पूर्वानुभव चांगला नसल्यामुळे त्यांना कामातून वगळण्यात आल्याचं सांगितलं होतं.


खरा चेहरा समोर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी स्थायी समितीच्या सभेत महिला बचत गटांना नालेसफाईच्या कामातून डावल्याबाबत आवाज उठवला होता. त्यावर प्रशासनाने याबाबत आपले स्पष्टीकरण दिलं असलं, तरी प्रत्यक्षात या महिला संस्थांना डावलण्याबाबत वेगळंच कारण पुढे येत असल्यामुळे प्रशासनाचा खरा चेहरा समोर आला आहे.



हेही वाचा-

डमी संस्थांच्या नावाखाली लाटतात वाहनतळांची कंत्राटे?

कचरा प्रस्तावाला प्रशासनामुळेच विलंब



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा