मनपाचा बॅनर-पोस्टर हटाव अभियान

 Dahisar
मनपाचा बॅनर-पोस्टर हटाव अभियान

दहिसर - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांचे बॅनर आणि पोस्टर मुंबईच्या गल्लीबोळात लागलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मंगळवारपासून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी दहिसर पूर्वेच्या एसव्ही रोडवर लागलेले बॅनर आणि पोस्टर हटवण्याच्या कामाल सुरुवात केली आहे. या संदर्भात मनपाच्या कर्मचाऱ्यांना विचारले असता प्रत्येक ठिकाणचे बॅनर आणि पोस्टर हटवले जात असून वेगवेगळ्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं

Loading Comments