Advertisement

वरळी ते चर्चगेटदरम्यान सायकल चालवा सुसाट!


वरळी ते चर्चगेटदरम्यान सायकल चालवा सुसाट!
SHARES

सुट्टीच्या दिवशी अनेकांना सायकल चालवायची इच्छा असते, पण जवळपास मोकळी जागा उपलब्ध नसल्याने आणि गाड्यांच्या गर्दीत अडकण्याची भीती वाटत असल्याने या मोहाला आवर घातला जातो. पण आता चिंता करण्याची गरज नाही. कारण मुंबई महापालिकेने शहरातील हौशी सायकलस्वारांसाठी एक ट्रॅक बनला आहे. या ट्रॅकवर मनसोक्त सायकल चालवण्याची मजा लुटता येईल.


कुठे आहे हा सायकल ट्रॅक?

चर्चगेटजवळील एनसीपीएपासून ते सी लिंकपर्यंत हा स्वतंत्र सायकल ट्रॅक बनवण्यात आला आहे. हा सायकल ट्रॅक ३ महिन्यांच्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला असून रविवारी ३ डिसेंबरपासून तो खुला करण्यात येणार आहे. या २२ किमीच्या सायकल ट्रॅकसाठी पायाभूत सुविधा महापालिकेतर्फे पुरवण्यात आल्या आहेत. 




'असा' अाहे मार्ग

एनसीपीए - नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राइव्ह) या मार्गे बाबुलनाथ, गोपाळराव देशमुख मार्ग (पेडर रोड), अॅनी बेझंट मार्ग, खान अब्दुल गफ्फार खान मार्ग, राजीव गांधी सागरी सेतू (वरळी सी-लिंक) या मार्गावरून सायकल चालवता येणार आहे.


वेळ

दर रविवारी सकाळी ११ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत हा सायकल ट्रॅक सुरू राहणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा