Advertisement

कुलाब्यातली झपाटलेली 'मुकेश मिल' शुटींगसाठी होणार बंद

चित्रपटांच्या शुटींगसाठी लोकप्रिय असलेली कुलाब्यातील ‘मुकेश मिल्स कंपाऊंड’ (Mukesh Mills) शुटींगसाठी बंद करण्यात येणार आहे.

कुलाब्यातली झपाटलेली 'मुकेश मिल' शुटींगसाठी होणार बंद
SHARES

चित्रपटांच्या शुटींगसाठी लोकप्रिय असलेली कुलाब्यातील ‘मुकेश मिल्स कंपाऊंड’ (Mukesh Mills) शुटींगसाठी बंद करण्यात येणार आहे. मुकेश मिल मोडकळीस आल्याने ही मिल शुटींगकरीता बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे. तसंच, त्या संदर्भात परिपत्रक देखील जारी केलं आहे. 


१८५२ साली मिलचं बांधकाम

मुलजीभाई माधवानी यांनी १८५२ साली या मिलचं बांधकाम केलं होतं. तसंच, या मिलमध्ये 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्या 'जुम्मा-चुम्मा' या सुपर हिट गाण्यांच चित्रीकरण करण्यात आलं होतं. तसंच, नुकताच प्रदर्शित झालेल्या लुका-छिपी या चित्रपटातील 'ये खबर छपवा दो अखबार में' या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलं आहे.


परिसराचं ऑडिट

मुंबई महापालिकेच्या 'ए' वार्डनं नुकताच एक परिपत्रक जारी करत त्या जागेच्या मालकाला 'या जागेतील अनेक इमारतींचं बांधकाम अतिशय कमकुवत झालं आहे. त्यामुळं या परिसराच ऑडिट होत नाही, तोपर्यंत चित्रपटाच्या शुटींगसाठी हा परिसर बंद ठेवण्यात यावा', असं सांगण्यात आलं आहे.


५० चित्रपटांचं शुटींग

मिल बंद पडल्यावर निर्माता-दिग्दर्शकांच्या डोळ्यात ही जागा भरली आणि या जागेत चित्रपटांचे शुटींग व्हायला सुरुवात झाली. सुरुवातीला या जागेमध्ये हॉरर चित्रपटांचं शुटींग होत होतं. त्यानंतर, जवळजवळ ५० चित्रपटांचं शुटींग या परिसरात झालं आहे. परंतू, या जागेतील अनेक इमारती ढासळल्या आहेत. तसंच, ज्या काही उरल्या आहेत त्या सुरक्षित नाहीत. त्यामुळे बीएमसी या जागेची पाहणी करणार आहे. धोकादायक असलेल्या इमारतींची डागडुजी करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

रन वेच्या दुरूस्तीचं काम पूर्ण, रविवारपासून मुंबई एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू

सायन उड्डाणपूल वाहतुकीसाठी २ महिने बंद



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा