Advertisement

रन वेच्या दुरूस्तीचं काम पूर्ण, रविवारपासून मुंबई एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू

दुरूस्तीच्या कामासाठी 'मुंबई एयरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड'ने मुंबई विमानतळ २ महिन्यांसाठी ठराविक वेळेत बंद ठेवलं होतं. आठवड्यातील मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी असे ३ दिवस विमानतळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६ तासांसाठी बंद राहिलं. त्याचा फटक सुमारे ५ हजार प्रवाशांना बसला.

रन वेच्या दुरूस्तीचं काम पूर्ण, रविवारपासून मुंबई एअरपोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू
SHARES

तब्बल २ महिन्यानंतर ३१ मार्चपासून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSIA) नियमीतपणे सुरू होईल. मागील २ महिन्यांपासून आठवड्यातील ३ दिवस ६ तास विमानतळ दुरूस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येत होतं. ज्याचा फटका हजारो प्रवाशांना बसला. विमानतळ नियमीतपणे सुरू झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

प्रवाशांना फटका

दुरूस्तीच्या कामासाठी 'मुंबई एयरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड'ने मुंबई विमानतळ २ महिन्यांसाठी ठराविक वेळेत बंद ठेवलं होतं. आठवड्यातील मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी असे ३ दिवस विमानतळ सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६ तासांसाठी बंद राहिलं. त्याचा फटक सुमारे ५ हजार प्रवाशांना बसला.

तिकीट वाढलं

परिणामी मुंबई-दिल्ली आणि मुंबई-बंगळुरू या व्यस्त मार्गावरील तिकीटांच्या किंमतीही वाढल्या. मुंबई ते दिल्लीदरम्या रोज अंदाजे १०० विमानांचं उड्डाण होतं. या उड्डाणांना वेळापत्रकातून हटवण्यात आलं होतं. सकाळ ते सायंकाळमधील विमानाचा समावेश रात्रीच्या वेळेत करण्यात आला. यामुळे या मार्गावरील तिकीटांच्या किंमती ९, ५०० रुपयांपर्यंत वाढल्या.

दुरूस्ती पूर्ण

याआधी मुंबई विमानतळावर २००९-१० मध्ये दुरूस्तीचं काम करण्यात आलं होतं. त्यावेळी दोन्ही रन वे चा पृष्ठभाग खराब झाला होता. गुरूवारी विमानतळ प्राधिकरणाने सांगितलं की दुरूस्तीचं काम ९८ टक्के पूर्ण झालं आहे. त्यानुसार ३१ मार्चपासून विमानतळ नियमीतपणे कार्यरत होईल.

ट्रॅफिकवर परिणाम

मुंबई विमानतळावरून दररोज ९५० विमानांत उड्डाण होतं. दुरूस्तीच्या कारणांमुळे २२ दिवसांमध्ये २३० विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं. विमानतळ बंद ठेवण्याबाबतची नोटीस सर्वच विमानकंपन्यांना देण्यात आली होती. परंतु सर्वच कंपन्यांना सकाळी ११ च्या आधी उड्डाण सेवा द्यायची असल्याने ट्रॅफिकचं प्रमाण वाढलं होतं.

हेही वाचा-

१ हजार वैमानिकांचा संपाचा इशारा, जेटपुढील अडचणी वाढल्या

लोकलच्या दरवाजाला निळे दिवे, अपघात रोखण्यासाठी उपाय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा