मुंबईत होणार दारूची होम डिलिव्हरी, मात्र...

मुंबई महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार शनिवारपासून घरपोच सेवा देण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे.

मुंबईत होणार दारूची होम डिलिव्हरी, मात्र...
SHARES

मुंबईत दारूची होम डिलिव्हरी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. या आदेशानुसार शनिवारपासून घरपोच सेवा देण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रात मात्र दारू मिळणार नाही, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.

राज्य शासनानं LOCKDOWN 4.0 मध्ये दिलेल्या परवानग्यांमध्ये अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत. प्रतिबंधित क्षेत्रात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कंन्टेंमेंट झोन वगळता अन्यत्र दारूची घरपोच विक्री करता येईल. दुकानं मात्र बंदच राहतील.

काही दिवसांपूर्वी राज्य शासनानं दारूविक्रीला परवानगी दिली होती. त्यानंतर दारूच्या दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र होतं. मुंबईकरांचीसुद्धा दारूसाठी झुंबड उडालेली पाहायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसला होता. त्यामुळे लगेचच हा निर्णय मागे घेत दारूची दुकानं मुंबईत बंद झाली होती. आताही दारूची दुकानं, काउंटरवरून मिळणाऱ्या दारूसाठी बंदच राहतील, पण ऑर्डर नोंदवून घरी मागवता येईल, असं या आदेशावरून स्पष्ट आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं बंदच आहेत. पुणे, मुंबई मेट्रोपॉलिटन क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन शिथिल करण्यात आलेला नाही.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांचे जीव वाचल्याचा दावा केंद्र सरकारनं केला आहे. लॉकडाऊन नसता तर देशातील परिस्थिती भयावह झाली असल्याचा अंदाज लावण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लॉकडाऊन उठवलं तर इतर देशांसारखी परिस्थिती होईल हे स्पष्ट केलं होतं. लॉकडाऊन लागू केला नसता तर देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ ते ७० लाखांपर्यंत पोहोचली असती. मात्र लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने लोक घरात थांबले होते. त्यामुळे या आजाराचा फैलाव रोखण्यात आला, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं.मेहबूब स्टुडिओ, झेवियर्स कॉलेज पालिकेच्या ताब्यात, इथंही १००० बेड्सची व्यवस्था

कोरोनाचा कहर! राज्यात दिवसभरात 2940 नव्या रुग्णांची नोंद, दिवसभरात 63 रुग्णांचा मृत्यू

संबंधित विषय