Advertisement

भटक्या मांजरांची होणार नसबंदी


भटक्या मांजरांची होणार नसबंदी
SHARES

मुंबईतील भटक्या कुत्र्यांबरोबरच भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्याची नगरसेवकांची मागणी  प्रशासनाने तत्वत: मान्य केली आहे. भटक्या मांजराच्या नसबंदीसाठी अॅनिमल वेल्फअर बोर्ड ऑफ इंडिया यांच्याकडून मांजर वर्गाला प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमात समाविष्ठ करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत नियमावली अस्तित्वात आल्यानंतर मुंबईतील भटक्या मांजरांची नसबंदी अर्थात निर्बिजीकरण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं जाईल, असं महापालिका आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.


मांजरांची गणना नाही

मुंबईतील पशुगणनेचं काम महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभाग यांच्यामार्फत पार पडतं. परंतू या पशुगणनेमध्ये भटक्या मांजराची गणना समाविष्ट नाही. त्यामुळेच सध्या महापालिकेला मुंबईत किती भटकी मांजरं आहे, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. अॅनिमल वेल्फअर बोर्ड  मार्गदर्शक तत्वे बनवली आहेत. त्यातील नियमावलीनुसार भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येते. मात्र, भटक्या मांजराची नसबंदी करण्याबाबत कुठलीही नियमावली नाही. त्यामुळे प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमांतर्गत भटक्या मांजरांना समाविष्ट करण्याबाबत व मार्गदर्शक तत्वे कळवण्यासाठी अॅनिमल वेल्फअर बोर्डशी पालिकेने पत्रव्यवहार केला आहे.


रेबीज देण्याची मागणी 

अॅनिमल वेल्फअर बोर्डाने मांजर वर्गाल प्राणी जनन नियंत्रण कार्यक्रमात समाविष्ट केल्यानंतर तसेच याबाबतच्या नियमावली अस्तित्वात आल्यानंतर मुंबईत मांजराची नसबंदी करण्याबाबत सकारात्मक पावलं उचलणं शक्य होईल, असं देवनार पशुवधगृहाचे महाव्यावस्थापक यांनी स्पष्ट केलं. भटक्या मांजरांचीही नसबंदी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनिल पाटणकर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या मांजराची नसबंदी करून त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देण्याचीही मागणी त्यांनी केली होती.



हेही वाचा - 

सोमवारी शाळांसह कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी

इंग्रजी शिकताय मग 'हे' कराच




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा