Advertisement

गोरेगाव-अंधेरी दरम्यान पालिका उभारणार चार पदरी उड्डाणपूल

पालिकेच्या या योजनेमुळे गोरेगाव ते अंधेरी दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोरेगाव-अंधेरी दरम्यान पालिका उभारणार चार पदरी उड्डाणपूल
FILE PHOTO
SHARES

मुंबईमध्ये (Mumbai) गोरेगाव खाडी ओलांडून अंधेरी (पूर्व) ते गोरेगाव (पश्चिम) जोडण्यासाठी पालिकेने (BMC) चार पदरी उड्डाणपूल (Four-Lane Flyover) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या बांधकामासाठी नागरी संस्थेने 418 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या आहेत.

पूल विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा पूल 500 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असेल, जो स्टेनलेस स्टीलचा असेल. या पुलावर केबल आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.

पालिकेच्या मते, गोरेगाव खाडीजवळ 36.6 मीटर लांबीचा रस्ता आहे. 1991 च्या विकास आराखड्यात खाडी क्षेत्र हा पूल बांधण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. या परिसरात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आता पालिकेने बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाडी परिसरातील काही भूखंड खाजगी आहेत आणि 350 झोपडपट्ट्या देखील आहेत. अंधेरी (पूर्व) आणि गोरेगाव (पश्चिम) वॉर्ड कार्यालये या झोपडपट्ट्या कायदेशीर आहेत की नाही याची पडताळणी करतील आणि त्यानंतर त्या इतरत्र हलवण्याचा निर्णय घेतला जाईल.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, दुसऱ्यांदा या प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत. साधारण स्टीलचा वापर करून पूल बांधण्याचे आम्ही पहिल्यांदाच ठरवले होते. नंतर, तो गंजू नये म्हणून स्टेनलेस स्टीलचा वापर करण्याचा निर्णय घेतला, कारण हा पूल खाडीवर बांधला जाणार आहे. स्टेनलेस स्टीलचा वापर केल्याने पुलाच्या देखभालीचा खर्च कमी होईल. 

पालिकेनं प्रकल्पासाठी निविदा मागवल्या आहेत आणि सल्लागाराची नियुक्ती केल्यानंतर, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (MCZMA) कडून परवानग्या मागवल्या जातील. या मार्गावर काही विजेच्या ताराही आहेत आणि त्या काढण्याबाबत पालिकाकंपनीशी चर्चा करेल.



हेही वाचा

मढमधल्या बेकायदेशीर स्टुडिओची पालिका करणार चौकशी

विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा