Advertisement

पूर्व द्रुतगती मार्गावर फुलली 'बसंत रानी'

पूर्व द्रुतहती मार्गवरील छेडानगर ते विक्रोळी दरम्यानच्या मार्ग बसंत रानीच्या झाडांनी बहरून गेला आहे. येणाऱ्या -जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष ही बसंत रानी वेधून घेत आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर फुलली 'बसंत रानी'
SHARES

मुंबईतील द्रुतगती मार्ग स्वच्छ आणि सुंदर दिसावेत यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून द्रुतगती मार्गावरील दुभाजकावर विविध प्रकारची झाडं लावण्यात आली आहेत. यात बसंत रानी या प्रकारातील झाडांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पालिकेकडून लावण्यात आलेल्या पूर्व द्रुतगती मार्गावरील बसंत रानींच्या झाडांनी सध्या सर्वांनाच आकर्षित केलं आहे. पूर्व द्रुतहती मार्गवरील छेडानगर ते विक्रोळी दरम्यानच्या मार्ग बसंत रानीच्या झाडांनी बहरून गेला आहे. येणाऱ्या -जाणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष ही बसंत रानी वेधून घेत आहे. फुललेल्या बसंत रानींच्या शकडो झाडांमुळे या रस्त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. महत्त्वाचं म्हणजे वसंत ऋतुत ज्या बसंत रानीला बहर येतो. पण पूर्व द्रुतगती मार्गावरील बसंत रानीला शिशिर ऋतुतच बहर आला आहे हे विशेष.



बसंत रानीची झाडं

पूर्व द्रुतगती मार्गावर पालिकेकडून २५ ते ३० फूट उंचीची बसंत रानीची झाडं लावण्यात आली आहेत. पालिकेकडून मुंबईतील विविध ठिकाणी २९ लाख ७५ हजार २८३ इतकी झाडं सुशोभिकरणाच्यादृष्टीनं लावण्यात आली आहेत. या झाडांमधील ६ हजार ५०० पेक्षा अधिक झाडं ही बसंत रानीची आहेत. यातीलच काही झाडं ही पूर्व द्रुतगती मार्गावर आहेत. या सर्व झाडांची दैनंदिन देखरेख पालिकेच्या उद्यान खात्याद्वारे केली जाते.



शिशिर ऋतुत फुलली बसंत रानी

पूर्व द्रुतगती मार्गावरील बसंत रानींच्या झाडांची देखरेख नियमितपणे आणि योग्य प्रकारे करण्यात आली. त्यामुळेच शिशिर ऋतुतही छेडा नगर ते विक्रोळी दरम्यानचा पूर्व द्रुतगती मार्गाचा दुभाजकाचा परिसर बसंत रानीनं बहरून गेला आहे. बसंत रानीचं देखण रूप प्रवाशांना आकर्षित करत असल्याची प्रतिक्रिया उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. तेव्हा शिशिर ऋतुमध्येच फुलेली बसंत रानी आणि तिचं देखणं रूप पाहण्यासाठी एकदा पूर्व द्रुतगती मार्गावर फेरफटका मारायला हरकत नाही.



हेही वाचा -

युतीची काळजी नको, हिंदुत्व मानणारे सोबत येतील - मुख्यमंत्री

पालिकेकडून जप्त केलेल्या प्लास्टिकचा लिलाव होणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा