Advertisement

पालिकेकडून जप्त केलेल्या प्लास्टिकचा लिलाव होणार

प्लास्टिकचा लिलाव करत प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेत अखेर पालिकेनं हा प्रश्न निकाली काढला आहे. प्लास्टिक लिलावातून घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराला त्यावर पुर्नप्रक्रिया करणं वा त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.

पालिकेकडून जप्त केलेल्या प्लास्टिकचा लिलाव होणार
SHARES

मुंबई महानगर पालिकेकडून शहरात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू असून गेल्या सात महिन्यांत पालिकेकडून ४८ हजार ८४३ किलो प्लास्टिक पालिकेकडून जप्त करण्यात केलं आहे. प्लास्टिकलाच बंदी असल्यानं आता जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकचं करायचं काय? असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला होता. अखेर या जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिकचा लिलाव करत प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेत अखेर पालिकेनं हा प्रश्न निकाली काढला आहे. पालिकेच्या निर्णयानुसार महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या नोंदणीकृत ठेकेदारांना लिलावात सहभागी करत त्यांच्याकडून जप्त प्लास्टिकचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा लिलाव होण्याची शक्यता आहे.


४८ हजार ८४१ किलो प्लॅस्टिक जप्त

२३ जून २०१८ पासून मुंबईत प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असून या दृष्टीनं पालिकेच्या पथकांची मुंबईतील बाजारपेठा, दुकान, मॉल्स यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. यानुसार जर कोणत्याही दुकानात प्लास्टिक आढळल्यास विक्रेत्यावर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्याच्याकडील सर्व प्लास्टिकही जप्त करण्यात येत आहे. त्यानुसार गेल्या सात महिन्यात पालिकेच्या विविध भागातील पथकांनी तब्बल ४८ हजार ८४१ किलो प्लॅस्टिक जप्त केलं आहे. जप्त करण्यात आलेलं हे सर्व प्लास्टिक पालिकेच्या गोदामात ठेवण्यात आलं असून एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या प्लास्टिकचं करायच काय? असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता.


जप्त प्लास्टिकचा होणार लिलाव

पालिकेनं जप्त प्लास्टिकचा लिलाव करण्याचा निर्णय घेत अखेर हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यानुसार जप्त करण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्या, चमचे, प्लेट्स, बाॅटल, थर्माकॉल यांसह इतर सामानांचा लिलाव करण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा लिलाव होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडील नोंदणीकृत ठेकेदारांनाच यात सहभागी करून घेण्याचे आदेश सर्व विभाग कार्यलयांना देण्यात आले आहेत. तसंच प्लास्टिक लिलावातून घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराला त्यावर पुर्नप्रक्रिया करणं वा त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे.


प्लास्टिक वापरणाऱ्यांचा परवाना रद्द

त्याशिवाय येत्या काही दिवसात प्लास्टिक वापरणाऱ्या विरोधात पालिका प्रशासन कठोर पाऊल उचलणार असून फेरीवाले किंवा दुकानदारांकडे प्लास्टिक पिशवी आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे. त्याशिवाय अशा फेरीवाल्यांना परवाना प्रक्रियेतून बाद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे छोटे दुकानदार किंवा फेरीवाले प्लास्टिक वापरू नये यासाठी पालिकेतर्फे प्लास्टिक वापर बंद करण्याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

१ फेब्रुवारीपासून टीव्ही होणार बंद!

सात महिन्यात ४८ हजार ८४१ किलो प्लास्टिक जप्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा