पालिकेच्या निविदा प्रकियेत बदल

 Pali Hill
पालिकेच्या निविदा प्रकियेत बदल

मुंबई - पालिकेची निविदा प्रक्रिया 15 आॅक्टोबरपासून अधिक पारदर्शक, गुणात्मक आणि स्पर्धात्मक होणार आहे. यासाठी निविदा प्रक्रियेत बदल करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेची नवीन पद्धतही लागू करण्यात आली आहे. या निविदा पद्धतीची अंमलबजावणी 15 आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. पालिकेची निविदा प्रक्रिया आॅनलाईन असली तरी पालिकेच्या निविदा प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केले जात होते. त्यामुळे पालिकेने उपायुक्त चंद्रशेखर चोरे यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सुचवलेल्या शिफारशीनुसार नवीन निविदा प्रक्रिया पद्धती लागू करण्यात येणार आहे.

Loading Comments