Advertisement

सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय लांबणीवर


सार्वजनिक शौचालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याचा निर्णय लांबणीवर
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबईतील सार्वजनिक शौचालयांमध्ये 5,000 सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन लावण्याची योजना तात्पुरती मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनाने 42 कोटी किमतीचा करार सध्या होल्डवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मशिन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना (UBT) आमदार अनिल परब यांनी केला. यासंदर्भातच त्यांनी गुरुवारी, 10 ऑगस्ट रोजी BMC प्रशासक इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. 

परब यांनी आरोप केला होता की, बीएमसीने शहरातील 5,000 सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवण्याचे कंत्राट दिले होते. मात्र, मुंबईत बीएमसी संचालित 5000 सार्वजनिक शौचालये नाहीत. जीईएम पोर्टलनुसार व्हेंडिंग मशीनची किंमत 40,000 रुपये असूनही, प्रत्येक मशीन 76,528 रुपये खर्चून खरेदी केली जात आहे आणि खरेदीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही परब यांनी केला होता.

परब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात बीएमसीच्या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन खरेदीत झालेल्या कथित घोटाळ्याचा मुद्दा मांडला होता. चर्चा करण्यास वेळ न दिल्याबद्दल चहल यांच्या विरोधात विधान परिषदेत विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता. त्यानंतर ही भेट झाली.

बैठकीनंतर परब यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, चहल यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की बीएमसी संचालित सार्वजनिक शौचालयांमध्ये आधीच स्थापित केलेल्या 200 मशिन्सच्या कामगिरीचा समाधानकारक तांत्रिक अहवाल येईपर्यंत मशीन्स घेण्याचे कोणतेही आदेश दिले जाणार नाहीत.

परब यांनी मात्र संपूर्ण करार रद्द करण्याची मागणी केली आणि सॅनिटरी पॅड खरेदीसाठी कोणतेही कंत्राट दिलेले नसल्यामुळे स्थापित 200 मशीन देखील काम करत नसल्याचा आरोप केला. दुसरीकडे, चहल यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की प्रकल्प पूर्णपणे रद्द केलेला नाही.



हेही वाचा

BMC ने खटारा वाहनांचा लिलाव करून 4.23 कोटी कमावले

प्लास्टिक पिशवी वापरल्यास मुंबईत फेरीवाल्यांसह ग्राहकांनाही लागणार दंड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा