अनधिकृत चौथरा-शेड पालिकेनं हटवला

 Ghatkopar
अनधिकृत चौथरा-शेड पालिकेनं हटवला

मुंबई – वाहतुकीत अडथळा येत असल्यानं सोमवारी अनधिकृत चौथरा-शेड हटवण्याचा निर्णय घेत एन विभागानं यासंबंधीची कारवाई केली. घाटकोपर, पंतनगर येथील वल्लभ बाग लेन ते रेल्वे पोलीस मैदानाकडं जाणाऱ्या रस्त्याच्या मधोमध 10 फूट रूंद, 15 फूट लांब असा एकूण 150 चौ. फुटांचा अनधिकृत चौथरा आणि शेड बांधण्यात आला होता. या चौथरा-शेडमुळे येथील वाहतुकीत अडथळा येत होता. तसंच प्रस्तावित रेल्वे पोलीस मैदानाच्या प्रवेशद्वारासमोरच हा अनधिकृत चौथरा-शेड होता. त्यामुळं हा या कारवाईला परिसराती रहिवाशांनी जोरदार विरोध केला. पण पालिका अधिकारी-पोलिसांनी चर्चा केल्यानंतर हा विरोध मावळला आणि अनधिकृत चौथरा-शेड हटवण्यात पालिकेला यश मिळाले. हा अनधिकृत चौथरा-शेड हटवण्यात आल्याने येथील वाहतुक सुरळीत होईल, असा दावा पालिकेनं केला आहे.

Loading Comments