Advertisement

शिवयोग केंद्रांसाठी रहिवासी ग्रुप, गृहनिर्माण संस्थांसोबत पालिकेची चर्चा

पालिका 1 जूनपासून योग केंद्रे सुरू करण्याची योजना आखत आहे जी लोकांना कोणत्याही खर्चाशिवाय प्रशिक्षण देऊ शकतील.

शिवयोग केंद्रांसाठी रहिवासी ग्रुप, गृहनिर्माण संस्थांसोबत पालिकेची चर्चा
SHARES

मुंबईतील 24 प्रशासकीय वॉर्डांमध्ये शिव योग केंद्रे स्थापन करण्यासाठी, बीएमसीने रहिवासी गट आणि विविध गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे.

तसेच आयुषच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि शिफारशींनुसार योग प्रमाणन मंडळ किंवा भारतीय योग संस्थेकडे दोन वर्षांसाठी नोंदणीकृत असलेल्या योग केंद्रांकडून स्वारस्य व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे.

या उपक्रमासाठी नियुक्त करण्यात येणार्‍या योग शिक्षकांना किंवा प्रशिक्षकांना तीन वर्षांचा अनुभव असावा आणि केंद्र सरकारच्या नियमांनुसार सामाईक योग प्रोटोकॉलमध्ये प्रशिक्षित केलेले असावे.

BMC 1 जूनपासून लोकांना मोफत प्रशिक्षण देणारी योग केंद्रे सुरू करण्याची योजना आखत आहे.

प्रशासकिय संस्थेने आपल्या बजेटमध्ये शहरात 200 योग केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. हा निधी योग प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आणि प्रशिक्षित शिक्षक किंवा वेलनेस इन्स्ट्रक्टर्सची नियुक्ती करण्यासाठी लॉजिस्टिक व्यवस्थेची सोय करेल.

या योगा केंद्रांसाठी २५ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुंबईत एकूण २०० शिव योगा केंद्र सुरु केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यातील १०० केंद्र सुरु होतील. यासाठी प्रशिक्षकांचे एक पॅनेलही तयार करण्यात येणार आहे.

इच्छुक नागरिकांच्या समुहासाठी समुह असेल. या सोबतच ज्या समुहाकडे शिवयोगा केंद्रासाठी खुली जागा, सभागृह, समाज मंदीर हॉल इत्यादींची सोय असल्यास ती ठळकपणे नमूद केल्यास त्यांना प्राधान्य.

ही जागा मोफत उपलब्ध होण्यारकरिता समन्वय करणे अथवा उद्यानातील मोकळी जागा, मैदान, शाळेचा हॉल अथवा समाज कल्याण केंद्र इत्यादी असे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येईल.

शिव योग केंद्राची पूर्वतयारी, अंमलबजावणी व पर्यवेक्षणाची जबाबदारी सार्वजनिक आरोग्य खात्याची असेल. ‌

ज्या योग प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात येईल, त्या संस्थेला सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत देण्यात आलेल्या महितीनुसार विभागवार योग केंद्रावर प्रशिक्षित व अनुभवी योग प्रशिक्षकाची नेमणूक करणे, ५ दिवस योग प्रशिक्षक उपस्थित राहील याची खबरदारी घ्यावी लागेल.

संस्थेद्वारे नेमण्यात येणा–या योग प्रशिक्षकाला नेमून दिलेल्या शिव योगा केंद्रावर नियमित व वेळेवर उपस्थित राहणे, योग्य प्रशिक्षण देण्याची जबाबदारी असेल.हेही वाचा

म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल, 'इतकी' मर्यादा निश्चित

मुंबईकरांसाठी दादरमध्ये आणखी एक व्हॅलेट पार्किंग सुविधा, जाणून घ्या कुठे?

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा