Advertisement

मुंबईकरांसाठी दादरमध्ये आणखी एक व्हॅलेट पार्किंग सुविधा, जाणून घ्या कुठे?

दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ शहरातील पहिल्या डिजीटल व्हॅलेट पार्किंग सुविधेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी दादरमध्ये आणखी एक व्हॅलेट पार्किंग सुविधा, जाणून घ्या कुठे?
(File Image)
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता दादरमधील सेना भवनाजवळील जिप्सी कॉर्नर रेस्टॉरंटमध्ये आणखी एक डिजिटल वॉलेट पार्किंग सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

दादरच्या प्लाझा सिनेमाजवळ शहरातील पहिल्या डिजीटल व्हॅलेट पार्किंग सुविधेला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ताज्या अहवालानुसार, 18 ते 22 मे दरम्यान, पार्क+ या स्टार्ट-अपद्वारे संचालित प्लाझा सिनेमा बूथवर 72 कार सोडण्यात आल्या.

व्हॅलेट्स प्लाझा सिनेमा ते कोहिनूर पब्लिक पार्किंग लॉट (पीपीएल) पर्यंत कार चालवतात आणि मोटारचालक पिक-अपसाठी विचारत नाही तोपर्यंत ते तिथेच ठेवतात.

पालिकेचे जी उत्तर सहाय्यक महापालिका आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, कोहिनूर पीपीएलमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असल्याने ही योजना शिवाजी पार्क परिसरात विस्तारित करता येईल का, हे प्रशासकिय संस्था शोधत आहे.

बुधवार, 18 मे रोजी, मुंबईच्या दादरमध्ये डिजिटल व्हॅलेट पार्किंगची सुविधा सुरू झाली. वृत्तानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबई पोलीस आणि दादर व्यापारी संघ यांच्या सहकार्याने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

पहिल्या चार तासांसाठी INR 100 आकारले जातील अशी नोंद करण्यात आली आहे. यानंतर प्रत्येक तासासाठी अतिरिक्त INR 25 लागतील. पार्क+ या स्टार्ट-अपद्वारे बूथ दररोज 11 तास चालवले जाईल. गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात व्यापारी संघटनेने तीन महिने मोफत वॉलेट पार्किंगची व्यवस्था केली होती.



हेही वाचा

मुंबई पोलीस आयुक्त सोशल मिडियाद्वारे साधणार नागरिकांशी संवाद

24 ते 27 मे दरम्यान मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये पाणीकपात

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा