Advertisement

24 ते 27 मे दरम्यान मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये पाणीकपात

२४ ते २७ मेदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे काम चालणार आहे.

24 ते 27 मे दरम्यान मुंबईतल्या 'या' विभागांमध्ये पाणीकपात
SHARES

मुंबईत २४ ते २७ मेदरम्यान चार तासांसाठी पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या काळात पिसे पांजरापूर संकुलातील पांजरापूर येथे १०० किलो व्होल्ट विद्युत उपकेंद्राच्या परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

२४ ते २७ मेदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत हे काम चालणार आहे. याच वेळेत पाच टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. ए, बी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, एल, एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभागात ही पाणीकपात असणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ‘एन’ आणि ‘एस’ विभागातील पूर्वेकडील भाग, संपूर्ण टी, एम पूर्व आणि एम पश्चिम विभाग, एल विभागातील पूर्वेकडील भाग, बी, ई, एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ए विभागाच्या पाणीपुरवठय़ामध्ये पाच टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर या विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी जपून वापरावे. पाणीकपातीपूर्वी एक दिवस आधी पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवार म्हणजेच तारीख 24 तारखेला भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) क्षेत्रातील बेलापुर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली या विभागात मंगळवार 24 रोजी पाणी पुरवठा संध्याकाळी होणार नाही.

मोरबे धरण (Morabe Dam) ते दिघा मुख्य जलवाहिनी (Digha main aqueduct) व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील मान्सुनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे होणार आहेत. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवणार आहे. त्याबरोबरच बुधवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.हेही वाचा

नवी मुंबईतील 'या' विभागांमध्ये पाणीपुरवठा बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा