Advertisement

लॉकडाऊन काळात मुंबईत बेकायदा बांधकामं जोरात

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामांना चांगलाच वेग मिळाल आहे.

लॉकडाऊन काळात मुंबईत बेकायदा बांधकामं जोरात
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं अनेकांचा रोजगार गेला तर, काहींची आर्थिकस्थिती बिकट झाली. मात्र, असं असताना लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामांना चांगलाच वेग मिळाल आहे. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत महापालिकेकडं अवैध बांधकामांच्या तब्बल १३ हजारांहून अधिक तक्रारी आल्या असून, ९५०० अवैध बांधकामांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त ४६६ बांधकामं पाडण्याची कारवाई करण्यात आली आहे.

मागील वर्षभरात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी आल्या, कितींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, याची माहिती माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी पालिकेकडून घेतली आहे. महापालिकेनं दिलेल्या लेखी उत्तरात ऑनलाइन प्रणालीवरील २५ मार्च २०२०पासून २८ फेबुवारी २०२१पर्यंतची माहिती देण्यात आली आहे.

महापालिका दरवर्षी सुमारे १५ हजार अवैध बांधकामांना नोटिसा देते तसंच, कारवाईसाठी पोलिस बंदोबस्तापोटी २० कोटी रुपये खर्च होतात. मात्र, प्रत्यक्षात कारवाई २० टक्क्यांपेक्षा अधिक बांधकामांवर देखील होत नाही, अशी माहिती शकील शेख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन विभागासह सर्वच विभागातील कर्मचारी कोरोना उपाययोजनांशी संबंधित कामांमध्ये व्यग्र होते. त्याचा गैरफायदा भूमाफिया, झोपडीदादा या असामाजिक तत्त्वांनी उचलून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामं केली आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर महापालिकेचे जवळपास सर्वच विभाग आपल्या नियमित कामावर रूजू झाले आहेत. त्यानंतरही महापालिकेला ही बांधकामं पाडावीशी वाटलेली नाहीत, याकडे लक्ष वेधले जात आहे.

अवैध बांधकामं

विभाग
तक्रारी
अवैध बांधकामं
कारवाई
कुलाबा ए
३२
२४
सँडर्हस्ट रोड बी
३६८
१८२
काळबादेवी सी
६१४
३८९
२४
ग्रँट रोड डी
१५१
७८
१५
भायखळा ई
५७९
४३६
माटुंगा एफ-उत्तर
१४८
९०
परळ एफ-दक्षिण
२९७
२१४
दादर जी-उत्तर
२०३
१८०
वरळी जी-दक्षिण
२१२
१२२
१५
वांद्रे एच-पूर्व
४५१
२३२
११
वांद्रे एच-पश्चिम
५२५
४२९
२१
अंधेरी के-पूर्व
४४१
३९५
३३
अंधेरी-के पश्चिम
३४२
३०२
५८
कुर्ला एल
३२५१
२००२
५२
चेंबूर एम-पूर्व
११९४
११७४
चेंबूर एम-पश्चिम
१२१३
६८७
३३
घाटकोपर एन
२८०
२४०
मालाड पी-उत्तर
४२९
३४२
६२
गोरेगाव पी-दक्षिण
४१६
२३३
कांदिवली आर-उत्तर
५९५
५०५
१४
बोरीवली आर-दक्षिण
३४८
३१४
७५
दहिसर आर-मध्य
३९८
१९६
विक्रोळी एस
५८९
५५२
मुलुंड टी
२४९
२४०


  • कालावधी : मार्च २०२० ते २८ फेबुवारी २०२१
  • ऑनलाइन तक्रारी : १३,३२५
  • दुबार तक्रारी : ३,७६७
  • अवैध बांधकामे : ९,५५८
  • पाडकामे : ४६६
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा