Advertisement

वर्षभरात बीएमसीला मिळाला ४७०० कोटींचा कर

कर वसूलीसाठी पालिकेने अभय योजना जाहीर केली होती. त्यानंतर थकबाकीदारांना दोन टक्के दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

वर्षभरात बीएमसीला मिळाला ४७००  कोटींचा कर
SHARES

मालमत्ता कर वसूल करण्याच्या उद्दिष्ट्यापर्यंत पोहोचण्यात मुंबई महापालिकेला जवळपास यश आलं आहे. वर्ष २०२०-२१ मध्ये पालिकेने ४७०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे.

मुंबई महापालिकेने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ५ हजार २०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र, गेल्या वर्षी लागू करण्यात आलेला कोरोना लाॅकडाऊन, कर्मचाऱ्यांची कमतरता, नागरिकांकडे असलेला पैशांचा अभाव यामुळे हे लक्ष्य पूर्ण होईल की नाही याबाबत शंका होती. लॉकडाउनमुळे कर वसुलीत अनेक अडथळे आले. मात्र, यावर पालिकेने मात केली आहे.

कर वसूलीसाठी पालिकेने अभय योजना जाहीर केली होती. त्यानंतर थकबाकीदारांना दोन टक्के दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कर न भरल्यास जलजोडणी, मलनि:सारण वाहिन्या खंडित करणे, चारचाकी वाहने, वातानुकूलित यंत्रणा यासारख्या महागड्या वस्तू जप्त करणे आदी कारवाई पालिकेने केली. त्यामुळे पालिकेला जास्तीत जास्त कर वसुली करता आली.  आता पूर्ण उद्दिष्ट्य गाठण्यासाठी पालिकेला आणखी ५०० ते ६०० कोटींची तूट आहे. ही तूट येत्या काही महिन्यांत भरून काढली जाणार असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्ता

मालमत्ताधारक – ४ लाख ५० हजार

निवासी – १ लाख २७ हजार

व्यावसायिक – ६७ हजारांपेक्षा अधिक

औद्योगिक – ६ हजार

भूभाग आणि इतर – १२,१५६



हेही वाचा -

  1. मालमत्ता कर थकवणाऱ्यांना दणका, सांडपाणी वाहून नेण्याचा मार्ग बंद

  1. अखेर 'सनराईज' रुग्णालयाला लागलं टाळं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा